आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड चॅम्पियन ते गव्हर्नर, पाहा \'टर्मिनेटर\' फेम आर्नोल्डचे निवडक PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिस्टर ऑलिंपिया टूर्नामेंट दरम्यान आर्नोल्ड स्वार्जनेगर... - Divya Marathi
मिस्टर ऑलिंपिया टूर्नामेंट दरम्यान आर्नोल्ड स्वार्जनेगर...
स्पोर्ट्स डेस्क- वयाच्या फक्त 20 वर्षी मिस्टर यूनिवर्स आणि मिस्टर ऑलिंपियाचे किताब जिंकला. कॅलिफोर्निया राज्याचा गव्हर्नर राहिला, जो फॅन्समध्ये टर्मिनेटर नावाने प्रसिद्ध आहे. हो आम्ही बोलतोय, आर्नोल्ड बाबत. आज 69 वर्षाचा (30 जुलै, 1947) झालेला आर्नोल्ड कधी काळी बॉडी बिल्डिंग दुनियातील बादशाह होता. आता अभिनयात करतोय धमाल...
- आर्नोल्ड सध्या अभिनय क्षेत्रात धमाल करतोय. 'टर्मिनेटर' या त्याच्या चित्रपटामुळे तो जगभरातील घराघरात पोहचला.
- 1970 मध्ये हर्क्यूलिस फिल्ममधून त्याने सुरुवात केली. 1976 मध्ये पहिला ‘गोल्डन ग्लोब फॉर न्यू मेल स्टार ऑफ द ईयर’ अवॉर्ड जिंकला.
- 1982 मध्ये आलेली फिल्म Conan the Barbarian मुळे आर्नोल्ड सुपरस्टार बनला होता.
- 1984 मध्ये फिल्म टर्मिनेटर आली, ज्याने त्याचे करिअरच बदलले.
- 1991 मेध्ये टर्मिनेटर-2 आणि 2003 मध्ये टर्मिनेटर-3 रिलीज झाली.
- नोव्हेंबर 2003 ते जानेवारी, 2011 पर्यंत तो गव्हर्नर राहिला. त्यामुळे या काळात त्याने अभिनयात ब्रेक घेतला.
- 2011 मध्ये हॉलिवूडमध्ये पुन्हा परतला तेव्हापासून आतापर्यंत त्याने 8 चित्रपट केले.
पहिला पुरस्कार: मिस्टर यूरोप
16 व्या वर्षी वेट ट्रेनिंग सुरु करणा-या आर्नोल्डने बॉडीबिल्डिंगचा किताब 1965 मध्ये 'ज्युनियर मिस्टर यूरोप' जिंकला होता. तेथून त्याने उडी घेतली व आज या उंचीपर्यंत पोहचला आहे. जेथे प्रत्येक जणाला जावेसे वाटेल. ही वेगळी बात यशाच्या शिखरावर असताना त्याला अनेक वादविवादांना सामोरे जावे लागले होते. पत्नीसोबत वाद, गव्हर्नर पदाचा राजीनामा आणि यासारखी अनेक वाद त्याने ओढावून घेतले. मात्र प्रत्येक वेळी आर्नोल्ड चॅम्पियन्सप्रमाणे बाहेर पडला.
पुरस्कार (निवडक)
- WWE हाल ऑफ फेम
- 7 वेळा मिस्टर ऑलिंपिया
- 1977 गोल्डन ग्लोब
- हॉलिवुड वॉक ऑफ फेम
- 4 वेळा मिस्टर यूनिवर्स
काही निवडक चित्रपट
- एक्सपेंडेबल्स सीरीज
- टर्मिनेटर सीरीज
- कमांडो
- पम्पिंग आयर्न
- द लास्ट स्टॅंड
- अराउंड द वर्ल्ड 80 डेज
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, आर्नोल्डची वर्ल्ड चॅम्पियनशिपपासून ते टर्मिनेटरपर्यंतची निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...