आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special India’S International Master Tania Sachdev Latest News In Marathi

B\'Day: ब्युटी विथ ब्रेन, ही कुणी मॉडल नसून आहे बुध्‍दीबळपटू, 8 व्‍या वर्षीच जिंकला किताब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिल्‍लीमध्‍ये आयोजित लाइफ स्‍टाइल इंडिया फॅशन वीकमध्‍ये कॅटवॉक करताना तानिया सचदेव)
वयाच्‍या आठव्‍या वर्षीच किताब जिंकणारी भारताची महिला बुध्‍दीबळपटू तानिया सचदेवचा आज वाढदिवस आहे. खूप कमी लोक जाणतात की, क्रिडाजगातील सर्वांधीक सौंदर्यवान 10 महिलांमध्‍ये तानियाच्‍या नावाचा उल्‍लेख होतो.

तानिया सचदेवचा जन्‍म 20 ऑगस्‍ट 1986 रोजी दिल्‍लीमध्‍ये झाला. तिच्‍या वडीलांचे नाव पम्‍मी आणि आईचे नावा अंजु सचदेव आहे. तानियाचे वडील बुध्‍दीबळपटू आहेत.
वयाच्‍या आठव्‍या वर्षीच जिंकला किताब
तानिया सचदेव लहानपणापासून अत्‍यंत चलाख आणि तल्लख बुध्‍दीची आहे. बुध्‍दीबळ तर तिच्‍या रक्‍तामध्‍ये भिनलेला आहे. तिने वयाच्‍या आठव्‍याच वर्षी बुध्‍दीबळाच्‍या किताबावर आपले नाव कोरले होते.
तानिया सचदेव भारताची सर्वांत आघाडीची महिला बुध्‍दीबळ पटू आहे. तिने 2005 मध्‍ये ग्रँडमास्‍टरचा किताब आपल्‍या नावे केला आहे. तर 2008 मध्‍ये इंटरनॅशनल मास्‍टर होण्‍याचा गौरव प्राप्‍त केला आहे.
2009 मध्‍ये अर्जुन पुरस्‍काराने सन्‍मानित
आशियाई खेळांमध्‍ये शानदान प्रदर्शन केल्‍यानंतर तानियाला भारतसरकारतर्फे दिला जाणारा अर्जुन पुरस्‍कार मिळाला. तानियाने 2010 मध्‍ये बुध्‍दीबळ ऑलिम्पियाडमध्‍ये सहभाग घेतला होता.

पुढील स्‍लाइडवर पाहा, तानिया सचदेवची मोहक छायाचित्रे...