आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Birthday Special Lasith Malinga Love Story With Tanya Perera

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मलिंगाची लव्‍हस्‍टोरी: जाहिरात चित्रिकरणादरम्‍यान मॅनेजरवर जडले प्रेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज, आपल्‍या अनोख्‍या शैलीने आणि भन्‍नाट वेगाने भल्‍या - भल्‍या फलंदाजांची धांदल उडवतो. परंतु प्रेमात मात्र 'क्लिन बोल्‍ड' झाला आहे. ए‍का जाहिरातीच्‍या चित्रिकरणादरम्‍यान त्‍याचा तानिया मिनोली पेरेरा (मॅनेजर) सोबत ओळख झाली. आणि पहिल्‍याच नजरेत मलिंगा तिच्‍या प्रेमात पडला.

तासंनतास फोनवर व्‍हायचे बोलणे
मलिंगाची पत्‍नी तनियाने एका मुलाखतीदरम्‍यान म्‍हटले की, 'आम्‍हा दोघांची पहिली भेट जाहिरातीच्‍या चित्रिकरणादरम्‍यान झाली. तेव्‍हापासून मलिंगा माझ्यावर प्रेम करायला लागला. दुस-या भेटीमध्‍ये दोघांनी एकमेकांना फोन नंबर शेअर केली. आणि तेथून प्रेमाच्‍या गुजगोष्‍टी सुरु झाल्‍या.'
लग्‍नासाठी प्रेयसीच्‍या वडिलांना पटवले
मलिंगाने तनियासमोर लग्‍नाचा प्रस्‍ताव ठेवला. परंतु तनियाने तिच्‍या वडिलांची परवानगी घ्‍यायला सांगितले. तनियाचे वडिल अमेरिकेमध्‍ये राहत होते. ते मायदेशी परतल्‍यानंतर मलिंगाने त्‍यांच्‍याशी चर्चा केली. आणि आपल्या प्रेमाविषयी आणाभाका घेतल्‍या. चर्चेचे रुपांतर लग्‍नामध्‍ये झाले. 22 जानेवारी 2010 मध्‍ये तनिया आणि मलिंगाचा विवाह झाला. त्‍यांना एक मुलगी आहे.
विश्‍वचषकामध्‍ये हॅट्रिक
लसिथ मलिंगाने 2007 च्‍या विश्‍वचषकामध्‍ये हॅट्रिक केली. त्‍याने चार चेंडूंवर चार विकेट मिळविल्‍या होत्‍या. दक्षिण आफ्रिकेवर निसटता विजय मिळविला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, तनिया आणि लसिथ मलिंगाचे निवडक छायाचित्रे..