भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म 7 जूलै 1981 रोजी झाला. 2004 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात करणा-या धोनीने लहानपणीची मैत्रीण साक्षी सोबत 2010 मध्ये विवाह केला. दोघांची भेट कोलकात्याच्या ताज हॉटेलमध्ये झाली होती आणि तात्काळ दोनच दिवसात त्यानी लग्न उरकले होते.
पहिल्याच भेटीमध्ये आवडायला लागली साक्षी
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधीक यशस्वी कर्णधार महेद्रसिंह धोनीची लव्हस्टोरी चांगली रंजक आहे. धोनी कोलकात्यामध्ये भारत विरुध्द पाकिस्तान कसोटी सामने खेळालया गेला होता. हॉटेल मॅनेजमेंटच्या इंटर्नशिपसाठी साक्षी ताज हॉटेलमध्ये होती. साक्षीच्या नजरेला नजर भिडताच धोनीला साक्षी आवडायला लागली होती.
फोनवर व्हायला लागले बोलने
दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर घेतले होते. आणि दोघांमध्ये प्रेमाची बरसात व्हायला लागली. त्याचवेळी धोनी बॉलिवूडच्या अभिनेत्रीसोबत प्रेमप्रकरण असल्याचे चर्चेत होते. पण त्याचा काही परिणाम साक्षी आणि धोनीवर झाला नाही. 4 जूलै 2010 मध्ये त्यांनी डेहराडून येथे लग्न केले.
लग्नामध्ये यांची होती उपस्थिती
या अत्यंत तात्काळ झालेल्या लग्नसोहळ्यामध्ये हरभजन सिंह, आशीष नेहरा, रूद्र प्रताप सिंह, सुरेश रैना आणि रोहित शर्मा शिवाय बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन उपस्थित होते.
बालपणातील सोबती
धोनी आणि साक्षी रांचीच्या डीएवी शामली शाळेमध्ये मित्र होते. दोघांचे वडील एकाच कंपनीमध्ये काम करत होते. साक्षी तिच्या परिवारासोबत नंतर डेहराडूनला स्थलांतरीत झाली. तर धोनी परिवार रांचीमध्ये होता.
(फोटोओळ - आयपीएल दरम्यान साक्षी समवेत धोनी)
पुढील स्लाइडवर पाहा, कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि साक्षीची निवडक छायाचित्रे...