आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special Of Indian Tennis Star Sania Mirza

B\'day : सानियाच्या जीवाला होता धोका, कुटुंबियांच्या आग्रहामुळे सोडले पाकिस्तान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आज तिचा 28वा (15 नोव्हेंबर 1986) वाढदिवस साजरा करीत आहे. हैदराबादी सानियाचे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न झाले असूनही ती पाकिस्तानात राहात नाही. सुटी मिळाली की शोएबच सानियाकडे अर्थात भारतात हैदराबादला किंवा दुबईमधील पाम जुमेराह येथील फ्लॅटवर भेटीसाठी येत असतो.
...यामुळे राहात नाही, पाकिस्तानात
सानिया मिर्झाचा विवाह 10 एप्रिल 2010 रोजी झाला. पाकिस्तानच्या वातावरणाशी ती परिचीत आहे. लग्नानंतर लागलीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने स्पष्ट केले होते, की शोएबसोबत ती दुबईत राहाणार आहे. पाकिस्तानमध्ये राहाण्यास नकार देण्यामागे तेथील परिस्थिती असल्याचे तिने म्हटले होते. भारत आणि पाकिस्तानचे संबंध देखील सुरळीत नसतात. दोन्ही देशांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण असते. पाकिस्तानमध्ये नेहमीच होत असलेले स्फोट यामुळे तिच्या कुटुंबियांना तिची चिंता वाटत राहाते.
सानियाच्या आई-वडिलांची इच्छा
सानियाने पाकिस्तानात राहावे ही तिच्या कुटुंबियांचीही इच्छा नाही. त्यांना भीती आहे, की सानिया तिथे सुरक्षीत राहु शकत नाही. शोएबसोबत तिचे लग्न याच अटीवर झाले होते, की ती पाकिस्तानात राहाणार नाही. सानियाचे वडिल इम्रान मिर्झा यांनी शोएबला भारतात किंवा दुबई मध्ये राहाण्याचा पर्याय दिला होता. दुबईचा पर्याय यासाठी देण्यात आला होता, कारण लाहोरपासून ते जवळ आहे आणि हैदराबादहून विमानाने जाण्यासाठी फक्त 3 तास लागतात.
टी-20 मॅचमधून जिंकला दुबईतील फ्लॅट
शोएब मलिकने 2008 मध्ये झालेल्या टी-20 सामन्यादरम्यान दुबईमध्ये एक फ्लॅट जिंकला होता. त्यानतंर त्याने दुबईचे नागरिकत्व स्विकारले होते. लग्नानंतर त्याने हा फ्लॅट सानियाला दिला आहे. दुबईत राहिल्याने या दोघांच्या स्पोर्ट करियरवर परिणामही होत नाही आणि त्यांना जास्त दिवस वेगळे देखील राहावे लागत नाही.
पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा, सानिया आणि शोएबच्या लग्नाचा अल्बम