आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

48 वर्षांच्या लाराची गर्लफ्रेंड केवळ 28 वर्षाची, जाणून घ्या इंटरेस्टिंग Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडिजचा शैलीदार फलंदाज ब्रायन लारा आणि माजी मिस स्कॉटलंड जॅमी बोअर्स... - Divya Marathi
वेस्ट इंडिजचा शैलीदार फलंदाज ब्रायन लारा आणि माजी मिस स्कॉटलंड जॅमी बोअर्स...
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटर ब्रायन लारा मंगळवारी (2 मे, 1969) 48 वर्षाचा झाला. लारा हा वेस्ट इंडिज संघातील अत्यंत धडाकेबाज फलंदाज होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत बरेच मोठमोठे विक्रम रचले. 47 वर्षांच्या लाराच्या नावे टेस्ट क्रिकेटमध्ये नाबाद 400 धावांचा विक्रम आहे. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. लाराला पहिल्या पत्नीपासून दोन मुली असून, तो आता एका मॉडेलला डेट करतो आहे. ही मॉडेल त्याच्यापेक्षा 5-10 नाही तर तब्बल 20 वर्षांनी छोटी आहे. हे दोघे 2014 पासून डेटिंग करत आहेत. मात्र, मागील काही दिवसापासून ते दोघे सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. लाराच्या वाढदिवसानमित्त आम्ही आपल्याला सांगत आहोत त्याच्याविषयीच्या काही खास आणि इंटरेस्टिंग फॅक्ट्स...
 
ब्रायन लाराने 1994 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात वैयक्तिक 375 धावांची खेळी करुन विश्वविक्रम केला. त्याची ही धावसंख्या कसोटी सामन्यातील तेव्हाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली होती. त्याचा हा विक्रम साधारणपणे 9 वर्षे आबाधित होता. मात्र 2003 मध्ये मॅथ्यू हेडनने 380 धावांची विक्रमी खेळी करून त्याचा हा विक्रम मोडित काढला. मात्र हेडनने प्रस्थापित केलेला हा नवा विक्रम फार काळ टिकू शकला नाही. अवघ्या सहा महिन्यांनंतर ब्रायन लाराने इंग्लंडविरुद्ध पुन्हा एकदा जबरदस्त खेळी करत नाबाद 400 धावांचा नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला. ही धावसंख्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, ब्रायन लाराची पहिली पत्नीसह त्याच्या ग्लॅमरस गर्लफ्रेंड जॅमीविषयी तसेच जाणून घ्या त्याच्याविषयीच्या काही इंटरेस्टिंग Facts.....
बातम्या आणखी आहेत...