आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Birthday SPL: Indian Cricketer Lakshmipathy Balaji Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day : या भारतीय क्रिकेटपटूच्‍या प्रेमात वेड्या झाल्‍या होत्‍या पाकिस्‍तानी तरुणी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - पत्‍नी प्रिया सोबत क्रिकेटपटू बालाजी)
भारताचा माजी क्रिकेटपटू, वेगवान गोलंदाज लक्ष्‍मीपती बालाजीचा आज वाढदिवस आहे. त्‍याचा जन्‍म 27 सप्‍टेंबर 1981 रोजी झाला. 2003-04 वर्षामध्‍ये जेव्‍हा भारतीय संघ पाकिस्‍तान दौ-यावर होता त्‍यावेळी त्‍याच्‍या कामगिरीमुळे पाकिस्‍तानच्‍या तरुणी बालाजीवर फिदा झाल्‍या होत्‍या. स्‍टेडिअममध्‍ये 'Will you marry me' अशा आशयाचे फलक घेवून त्‍या उभ्‍या होत्‍या.
मालिकेमध्‍ये ठरला हिरो
2003-04 मध्‍ये जेव्‍हा भारतीय क्रिकेट संघ पाकिस्‍तान दौ-यावर होता. त्‍यावेळी कर्णधार सौरव गांगुली होता. या मालिकेमध्‍ये आपल्‍या अतुलनिय प्रदर्शनामुळे बालाजी हिरो ठरला होता.
बॅट तोड षटकार
एकदिवसीय मालिकेतील 24 मार्च रोजी खेळल्‍या गेलेल्‍या सामन्‍याध्‍ये बालाजीने रावळपींडी एक्‍सप्रेस शोएब अख्‍तरला उंच षटकार ठोकला होता. त्‍याचवेळी त्‍याची बॅट तुटली होती. आणि संपूर्ण स्‍टेडिअममध्‍ये बालाजीच्‍या नावाचा जयघोष सुरु होता.
मॉडलसोबत केले लग्‍न
बालाजीने मॉडेल प्रिया थलूरसोबत सप्‍टेंबर 2013 मध्‍ये लग्‍न केले. आपल्‍या व्‍यस्‍त वेळापत्रकामुळे खेळाडू मोठ्या संख्‍येने उपस्थित राहू शकले नसले तरी, मुरली विजय, सुब्रमण्‍यम बद्रीनाथ, अनिरुध्‍द श्रीकांत, एन. श्रीनिवास आदी उपस्थित होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, बालाली आणि प्रिया थलूर यांची निवडक छायाचित्रे..