आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday SPL Of Former West Indian Cricketer Joel Garner

हे आहेत जगातील सर्वात उंच क्रिकेटर्स, कोणाला म्हणतात लंबू तर कोणी बीग बर्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू ज्योअल गार्नर यांचा आज - 16 डिसेंबर 62 वा (1952) वाढदिवस आहे. क्रिकेटमधील ते दुसरे सर्वात उंच खेळाडू होते. त्यांच्या उंचीमुळे त्यांना बीग बर्ड किंवा बीग ज्योअल देखील म्हटले जात होते. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त आज आम्ही तुम्हाला जगभरातील उंच क्रिकेटर्सची ओळख करुन देत आहोत.
उंची ही दैवी देणगी मानली जाते. क्रिकेटमध्ये गोलंदाज हा उंच असेल तर त्याचा गोलंदाजीवर चांगला परिणाम होतो. हाय आर्म बॉलरला खेळणे सोपे नसते. त्यामुळे क्रिकेटमध्ये उंच गोलंदाजांना अधिक महत्त्व आहे. ज्योअल गार्नर, स्टिव्ह फिन आणि क्रिस ट्रेमलेट या गोलंदाजांनी टाकलेला सर्वसाधारण चेंडू मध्यम उंचीच्या फलंदाजांच्या छातीपर्यंत येतो.
हे आहेत, जगातील सर्वाधिक उंच क्रिकेटर्स
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान हा जगातील सर्वात उंच क्रिकेटर आहे. त्यांची उंची 7 फुट एक इंच आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या ज्योअल गार्नर (उंची 6 फुट 8 इंच) यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या उसळत्या चेंडूसमोर फलंदाज जास्तवेळ टिकाव धरू शकत नव्हते.
उंचीचा गोलंदाजीला फायदा
गोलंदाज उंच असेल तर त्याचा त्याच्या गोलंदाजीला फायदा होतो. वेगवान पीचवर उंच गोलंदाजांची मारकक्षमता दुपटीने वाढते. उसळणारा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज बॅकफूटवर जातो किंवा स्लिपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो. दो्न्ही ठिकाणी खेळल्याने फलंदाज संकटात सापडतो आणि बाद होतो.
पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा जगातील उंच गोलंदाज