आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल म्‍हणजे \'एन्‍टरटेन्‍मेंट, एन्‍टरटेन्‍मेंट आणि एन्‍टरटेन्‍मेंट\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यांनी भल्‍या-भल्‍यांची दांडी उडवणारे टीम इंडियाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदीं आता आयपीएलवर घसरले आहेत. आयपीएल म्‍हणजे भारतीय क्रिकेटची विद्या बालन असून यामध्‍ये फक्‍त एन्‍टरटेन्‍मेंट, एन्‍टरटेन्‍मेंट आणि एन्‍टरटेन्‍मेंटच असल्‍याची टीका त्‍यांनी केली आहे.

डर्टी पिक्‍चर चित्रपटांत ज्‍याप्रमाणे विद्या बालनने एन्‍टरटेन्‍मेंट, एन्‍टरटेन्‍मेंट आणि एन्‍टरटेन्‍मेंट म्‍हटलं होतं, तशीच अवस्‍था सध्‍या आयपीएलची आहे. त्‍यामुळे आयपीएल हे भारतीय क्रिकेटमधील विद्या बालन झाले आहे. कसोटी क्रिकेट हाच आपला वारसा आहे. त्‍याचे जतन करण्‍याचे प्रयत्‍न होताना दिसत नाही, त्‍यामुळे दु:ख होते, असे ते म्‍हणाले.