आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅटको युनायटेड आमदार चषक विजेता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सय्यद सरफराजच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर बॅटको युनायटेड संघाने सुपर स्पोर्ट्सवर 95 धावांनी विजय मिळवला. या विजयी कामगिरीसह आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अष्टपैलू कामगिरी करणारा सय्यद सरफराज सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
पीईएस महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम खेळणाºया बॅटको संघाने 20 षटकांत 4 बाद 165 धावा केल्या. यात सरफराजने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. हुसेन अमोदी आणि कौसिम कादरी यांनी प्रत्येकी 38 धावांचे योगदान दिले. सुपरतर्फे गोलंदाजीत रिजवान कुरेशीने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरात बॅटकोच्या भेदक गोलंदाजीपुढे सुपरच्या फलंदाजांनी नांग्या टकाल्या. त्यांचा संघ केवळ 70 धावांत गारद झाला. यात संदीप नागरेने एकाकी लढत देत सर्वाधिक 30 धावा काढल्या. गोलंदाजीत सरफराज आणि बबलू पठाणने प्रत्येकी 3 गडी टिपले. उत्कृष्ट खेळाडू : फलंदाज - विशाल चौव्हान, गोलंदाज - संदीप कुलकर्णी, यष्टिरक्षक - शोएब अहमद.