आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगनर, मार्टिनचा‘चौकार’; इंग्लंडचा 167 धावांत खुर्दा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ड्युनेडिन - नील वेगनर (42 धावांत 4 विकेट) आणि ब्रुस मार्टिन (43 धावांत 4 बळी) यांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत इंग्लंडवर दबाव निर्माण केला आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात इंग्लंडला 167 धावांतच गुंडाळले. प्रत्युत्तरात न्यूझीडलडने बिनबाद 131 धावा काढल्या. न्यूझीलंड टीम अद्यापही 36 धावांनी मागे आहे. किवींचे ओपनर पीटर फुल्टन 46 व हमिश रुदरफोर्ड 77 धावा काढून नाबाद आहेत.

न्यूझीलंडने बुधवारी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. कसोटीच्या दुसर्‍या दिवशी फलंदाजीसाठी उतरलेली इंग्लिश टीम न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर टिकू शकली नाही. 55 षटकांत इंग्लंडच्या सर्व विकेट पडल्या.

पहिल्या तीन विकेट स्वस्तात : इंग्लंडचे प्रमुख फलंदाज निक कॉप्टन व केविन पीटरसन भोपळा न फोडताच स्वस्तात बाद
झाले. अ‍ॅलेस्टर कुक 10 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.

ट्रॉटच्या 45 धावा : इंग्लिश फलंदाजांमध्ये जोनाथन ट्रॉटने चार चौकारांच्या साहाय्याने सर्वाधिक 45 धावा काढल्या. यासह इयान बेलने 24, मॅट प्रायर व जेस अँडरसनने प्रत्येकी 23 धावा काढल्या.

संक्षिप्त धावफलक - इंग्लंड-पहिला डाव-167, न्यूझीलंड-पहिला डाव -बिनबाद 131 धावा ( फुल्टन नाबाद 46, रुदरफोर्ड नाबाद 77)