आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Blade Runner Killed His Girlfriend Because She Was Cheating Him

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दगा दिल्‍यामुळेच \'ब्‍लेड रनर\'ने केली प्रेयसीची हत्‍या?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्‍सबर्ग- 'ब्‍लेड रनर' ऑस्‍कर पिस्‍टोरियसच्‍या प्रेयसीच्‍या हत्‍याप्रकरणाला वेगळेच वळण मिळण्‍याची शक्‍यता आहे. त्‍याची प्रेयसी रीवा स्‍टीनकँप हिचे दक्षिण आफ्रिकेच्‍या एका प्रसिद्ध रग्‍बीपटूसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. प्रेयसीने दगा दिल्‍यामुळेच ऑस्‍करने तिची हत्‍या केली, अशी माहिती समोर येत आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रीवाचे रग्‍बीपटू फ्रँकॉईस होगार्ड याच्‍यासोबत सूत जुळले होते. ऑस्‍कर आणि रीवाचे अनेक वर्षांपासून प्रेम संबंध होते. परंतु, प्रेयसीकडून दगा मिळेल, असे त्‍याला वाटले नव्‍हते. त्‍यामुळेच तिची त्‍याने हत्‍या केली, असा तपास अधिका-यांचा कयास आहे. आता त्‍या दिशेनेही तपास करण्‍यात येत आहे.

ऑस्‍करच्‍या घरी काल रक्ताने माखलेली क्रिकेटची बॅट आढळली होती. तर रीवाची कवटी पूर्णपणे मोडल्‍याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले आहे. तिच्‍या डोक्‍यावर जोरदार प्रहार करण्‍यात आला होता. आता हा वार ऑस्‍करने केला होता का आणि केला असेल तर स्‍वतःच्‍या रक्षणासाठी केला ही हत्‍येच्‍याच उद्देशाने केला, या प्रश्‍नांचा शोध घेण्‍यात येत आहे.