आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Blade Runner Pistorious Shoots Girlfriend Dead On Valentine S Day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: या \'ललने\'वर ऑलिपिंक स्‍टारने झाडल्‍या गोळया !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्‍सबर्ग- दक्षिण आफ्रिकेचा स्‍टार 'ब्‍लेड रनर' ऑस्‍कर पिस्‍टोरियससाठी 'व्‍हॅलेंटाईन डे' हा काळा दिवस ठरला. पॅरालिंपिक गोल्‍ड मे‍डलिस्‍ट ऑस्‍करने नजरचुकीने आपल्‍या प्रेयसीवरच गोळी झाडली. याप्रकरणी पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले आहे.

ब्‍लेड रनर नावाने प्रसिद्ध असलेल्‍या ऑस्‍करची प्रेयसी सकाळी-सकाळी त्‍याला सरप्राईज देण्‍यासाठी घरी आली होती. मात्र, पिस्‍टोरियसला घरात कोणी महिला चोरीच्‍या इराद्याने घुसल्‍याचे वाटले. आणि त्‍याने पिस्‍तुलने तिच्‍यावर गोळया झाडल्‍या.

दक्षिण आफ्रिकेच्‍या बोल्‍ड वृत्तपत्राने दिलेल्‍या माहितीनुसार पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे. जोहान्‍सबर्ग पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला असून 26 वर्षीय पिस्‍टोरियसवर खुनाचा गुन्‍हा दाखल केला गेला आहे. प्रिटोरिया येथील लक्‍जरी हाऊसिंग एस्‍टेटच्‍या बाहेर एक मृत महिला आढळून आली होती. तिच्‍या डोक्‍यावर आणि हाताला गोळी लागली होती, असे पोलिसांनी सांगितले. ती मृत महिला एफएचएम च्‍या मुखपृष्‍टाची मॉडेल रीवा स्‍टीनकँप आहे. गेल्‍याच आठवडयात रीवाने संडे टाईम्‍स या वृत्तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीत ऑस्‍करबरोबरील आपल्‍या प्रेमसंबंधाची कबुली दिली होती.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या पिस्‍टोरियस आणि त्‍याच्‍या अफेअर्सची कहाणी...