आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blame Game Begins After Tragic Death Of Bengal Cricketer Ankit Keshri

ह्यूज प्रमाणेच अंकितच्याही डोक्याला लागला होता मार, नाही झाला योग्य उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - क्रिकेट सामन्यादरम्यान कॅच घेताना सहकारी खेळाडूला धडकल्याने जीव गमवावा लागलेला क्रिकेटर अंकित केशरीच्या डोक्याच्या मागील बाजूला गंभीर दुखापत झाली होती. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा फिलिप ह्यूज याच्याही डोक्याला मागील बाजूला हेल्मेटच्या खाली दुखापत झाली होती. असाच काहीसा अपघात अंकितसोबत देखील झाला आणि सोमवारी हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली.
वैद्यकीय हलगर्जीपणाचे आरोप आता केले जात आहेत. ईस्ट बंगाल क्रिकेट क्लबने अंकितवर योग्य उपचार केले नाही, असाही आरोप केला जात आहे. दरम्यान एमरी (AMRI) हॉस्पिटलने त्यांची बाजू मांडली आहे. त्यात म्हटले आहे, की अंकितचे उपचार पूर्ण होण्याआधीच त्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. मात्र, क्लबने वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप फेटाळून लावला आहे.

शुक्रवारी ईस्ट बंगाल आणि भवानीपूरदरम्यान सामना चालू होता. १२ वा खेळाडू म्हणून अंकित बाहेर बसून सामना पाहत होता. सामन्याच्या दुसऱ्या शेवटच्या षटकात अर्णव नंदी जखमी झाल्यामुळे अंकित क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. कर्णधाराने त्याला स्वीप कव्हरसाठी उभे केले. डावखुरा वेगवान गोलंदाज सौरव मंडलच्या चेंडूवर फलंदाजाने लांब शॉट मारला आणि चेंडू हवेत उंच उडाला. कव्हरला उभा असलेला अंकित कॅच घेण्यासाठी धावला. तिकडे वेगवान गोलंदाज सौरवही फॉलो थ्रूमध्ये कॅच घेण्यासाठी धावला. याचदरम्यान दोघांत जोराची धडक झाली आणि अंकितच्या तोंडातून रक्त येऊ लागले. तो तेथेच कोसळला आणि बेशुद्ध पडला. फलंदाजी करत असलेला बंगालचा माजी स्पिनर शिवसागर सिंह आणि फलंदाज अनुप मुजुमदार त्याच्या जवळ धावत आले. शिवसागरने तत्काळ तोंडाने कृत्रिम श्वासाेच्छ‌््वास दिला. अंकितने श्वास घेणे सुरू केले. त्यानंतर त्याला जवळच्याच एमरी रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी सायंकाळी अंकितने तो बरा होत असल्याचे संकेत दिले होते. त्याला जेवणही देण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा प्रकृती बिघडली. सोमवारी पहाटे त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली.
ममता बॅनर्जींना धाडस नाही झाले अंकितला पुष्पांजली वाहण्याचे
अंकित केशरीच्या निधनाबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शोक व्यक्त केला आहे. ईस्ट बंगाल क्लबच्या टेंटमध्ये अंकितचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्याला श्रध्दांजली वाहण्यासाठी आलेल्या ममता बॅनर्जी बराचवेळ शांत उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, 'मला मोठा धक्का बसला आहे. अशा तरुण खेळाडूबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला कळत नाही अशा युवा खेळाडूच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे कसे सांत्वन करावे. मी फक्त त्याला पाहायला आले आहे.' अतिशय दुःखी झालेल्या ममता बॅनर्जींनी अंकितच्या पार्थिवावर पुष्पांजली देखील वाहिली नाही. त्या बराच वेळ स्तब्ध उभ्या होत्या.
फोटो - जगमोहन दालमिया यांनी अंकितला श्रद्धांजली वाहिली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, श्रद्धांजली वाहातानाचे फोटो