आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Blead Runner's All Invovlement Of Matches Cancelled

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्लेड रनरचा सर्व सामन्यांतील सहभाग रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - ऑस्कर प्रिस्टोरियस अर्थात ‘ब्लेड रनर’चा पुढच्या तीन महिन्यांत होणा-या सर्व सामन्यांतील सहभाग रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती त्याच्या व्यवस्थापकाने दिली आहे. प्रिस्टोरियसवर आपल्या महिला मित्राचा खून करण्याचा आरोप आहे.

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक धावपटू प्रिस्टोरियसवर शुक्रवारी आपली 29 वर्षीय महिला मित्र रिवा स्टिनकेम्पच्या खुनासाठी आरोप निश्चित करण्यात आले. रिवाला प्रिटोरिया येथील घरात गोळी मारण्यात आली होती. प्रिस्टोरियसचा मार्च ते मेदरम्यान ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इंग्लंड आणि अमेरिकेत होणा-या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी करार झाला होता. मात्र, या स्पर्धांतील त्याचा सहभाग रद्द करण्यात आला आहे. याबाबत अधिक महिती देताना त्याचा मॅनेजर पीटर वॉनने एका संकेतस्थळाला म्हटले, ‘या अप्रिय घटनेनंतर नजीकच्या सर्व स्पर्धांतील सहभाग रद्द करण्यात आला आहे. आमच्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे ऑस्कर प्रिस्टोरियस कायदेशीर प्रक्रियेत लक्ष देऊ शकेल.’
मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार प्रायोजक आणि भागीदार या काळात न्यायालयीन निकालाची वाट बघतील.