आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धावपटू ब्लेड रनरच्या घरी सापडली रक्ताने माखलेली बॅट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जोहान्सबर्ग - गर्लफ्रेंडची हत्या केल्याचा आरोपी दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर प्रिस्टोरियस ब्लेड रनरच्या घरातून रविवारी रक्ताने माखलेली एक बॅट मिळाली आहे. एका स्थानिक वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार ऑस्करची मॉडल गर्लफ्रेंड 30 वर्षीय रीवा स्टिनकेम्पच्या डोक्यावर वार करण्यात आले होते.

प्रकरणाची चौकशी करीत असलेल्या पोलिस सूत्राने वर्तमानपत्राला माहिती देताना त्याच्या घरातून एक रक्ताने माखलेली बॅट सापडल्याचे म्हटले आहे. या बॅटीचा उपयोग स्टिनकेम्पला मारण्यासाठी करण्यात आला होता की स्टिनकेम्पने स्वत:च्या बचावासाठी ही बॅट वापरली, याचा तपास पोलिस घेत आहेत. अपघाताच्या दिवशी स्टिनकेम्पने नाइटी परिधान केली होती, असेही वर्तमानपत्राने लिहिले. ‘पोलिस सूत्रांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार स्टिनकेम्पला सुरुवातीला बेडरूममध्ये गोळी मारण्यात आली. यानंतर ती पळाली आणि स्वत:ला वाचवण्यासाठी बाथरूममध्ये लपली. यानंतर गुन्हेगाराने तिला
आणखी तीन गोळ्या घातल्या,’ असे वर्तमानपत्राने लिहिले आहे.