आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेत चालणार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची मर्जी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी घेतलेल्या निर्णयानंतर आता भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा वाढणार आहे. नव्या नियमानुसार आयसीसीची एक कार्यकारिणी बनवली जाणार आहे. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्या प्रतिनिधींचा समावेश राहील. त्यामुळे आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवणा-या या संघटनांचे बळ आता आणखी वाढणार आहे.
दोन महत्त्वपूर्ण निर्णय : नव्या टू टियर सिस्टिमनुसार आयसीसीसोबत संलग्नित असोसिएट सदस्यांनाही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. कसोटीचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी लवकरच एका विशेष कोशाचे गठन करण्यात येणार आहे.
भविष्यकालीन दौरा कार्यक्रम रद्द : द्विपक्षीय मालिका आयोजनाचा दृष्टिकोन समोर ठेवून भविष्य दौरा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णयही आयसीसीने घेतला आहे. क्रमवारीतील 8 अव्वल संघांना आता एकमेकांविरुद्ध सामने खेळण्याचे बंधन नसेल.
बीसीसीआयला न्यूझीलंडचे समर्थन
आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट संरचनेत मूलभूत बदल करण्याच्या कारणावरून विविध देशांचा विरोध पत्करणा-या बीसीसीआयला न्यूझीलंड मंडळाने समर्थन दिले आहे. सर्वाधिक महसुलाची कमाई करणा-या बीसीसीआयचा आयसीसीवर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी चर्चा होती; परंतु न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे (एनझेडसी) आयसीसीमधील प्रतिनिधी मार्क स्नोडेन यांनी सांगितले की, बीसीसीआयचा आयसीसीत कोणताच हस्तक्षेप नाही. नवे प्रस्ताव लागू झाल्यास न्यूझीलंड क्रिकेट मंडळाच्या महसुलात वाढ होऊ न तो 7 ते 10 कोटी डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. सध्या या मंडळाला 5.2 कोटी डॉलरचा महसूल मिळतो.