विश्‍वास ठेवा! अशी / विश्‍वास ठेवा! अशी खतरनाक गोलंदाजी शैली तुम्‍ही कधी पाहिलीच नसेल

दिव्य मराठी वेब टीम

Dec 17,2011 01:22:55 PM IST

नवी दिल्‍ली- क्रिकेटमध्‍ये असे अनेक गोलंदाज आपल्‍या अनोख्‍या शैलीमुळे चर्चेत राहिले आहेत. ऑस्‍ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज जेफ थॉमसनही आपल्‍या वेगापेक्षा विचित्र शैलीसाठी जास्‍त प्रसिद्ध होता.
तो अशी गोलदांजी करायचा की, दिग्‍गज फलंदाजांनाही खेळता यायचे नाही. फलंदाज तर सोडाच विकेटकीपरलाही चेंडू पकडताना त्रास व्‍हायचा. सध्‍या आपल्‍या विचित्र शैलीसाठी श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगा जरी चर्चेत असला तरी थॉमसनच्‍या शैलीसमोर तो काहीच नाही. तो वेगात पळत यायचा आणि चेंडू टाकताना आपली गती कमी करायचा त्‍याचबरोबर हात पूर्णपणे मागे घ्‍यायचा. त्‍यामुळे समोरचा फलंदाज बुचकाळयात पडायचा.
जर त्‍याने गोलंदाजी टाकताना रनअप कमी केला तर त्‍याच्‍या चेंडूचा वेग 20 किमी. प्रति तास कमी व्‍हायचा. थॉमसन 147.9 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करायचा. त्‍याने वेगात मायकल होल्डिंग (141.3 किमी) आणि इमरान खान (139.7) यांनाही मागे टाकले होते.
जेफ थॉमसनची गोलंदाजी पाहा सोबतच्‍या व्हिडिओमध्‍ये...

X
COMMENT