आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुष्टियुद्धाची राष्ट्रीय विजेती, मात्र सराव झोपडपट्टीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपूर्वी 14 वर्षांच्या वयोगटात तिने सबज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली. ती सध्या मुष्टियुद्धातील राष्ट्रीय विजेती आहे. कोलकात्याच्या एका झोपडपट्टीत राहून राष्ट्रीय विजेत्यापर्यंतची मजल मारणे चैताली कापटसाठी तेवढे सोपे नव्हते. मात्र, तिच्यासमोरील आव्हाने आणखी खडतर होती. गेल्या दोन वर्षात तिचा सराव थांबला आहे. स्पोटर्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने तिच्यासाठी प्रशिक्षणाची सोय केली नाही की तिच्यासाठी कोणता खासगी प्रायोजकही मिळाला नाही.

सोळा वर्षांच्या चैतालीच्या संघर्षावर अल जजिरा अमेरिकाने एक माहितीपट तयार केला आहे. ‘फिस्ट्स ऑफ युरी’- ब्रुस लीच्या प्रसिद्ध चित्रपटाच्या नावावर हे नाव आहे. याला नुकतेच अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. चैतालीला प्रशिक्षण मिळावे यासाठी माहितीपटाच्या दिग्दर्शिका रीड लिंडसे यांनी आता स्वत: निधी संकलन सुरू केले आहे. 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याचे तिचे स्वप्न आहे. रीड लिंडसेने चैताली आणि तिचे प्रशिक्षक संजीव बॅनर्जी यांना बारा-बारा हजार पाठवले आहे. यातील पाचशे घराच्या डागडुजीसाठी खर्च केले. उर्वरित पैशातून ती बूट आणि ट्रॅक सूट खरेदी करू इच्छिते.

चैतालीला घर नाही. ती कोलकात्याच्या नूतनपल्ली झोपडपट्टीतील एका झोपडीत राहते. घरात आई आणि मोठी बहीण आहेत. वडील राज मिस्त्री यांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले. आईला दरमहा अडीच हजार रुपयांची नोकरी असल्यामुळे अन्नपाण्याची सोय करण्यात अनेक अडचणी येतात. अशात खेळ आणि प्रशिक्षण तिच्यासाठी खूप लांबच्या गोष्टी आहेत. त्यामुळे ती आपल्या झोपडीत पॅचिंग बॅग बांधून दिवसभर सराव करत आहे. प्रशिक्षक तिला शेजारच्या घरावरील छतावर धडे देतात. तिला कोणते स्टेडियम नाही ना जिम.
अखेर तिला मुष्टियुद्धामध्ये आवड कशी निर्माण झाली, या प्रश्नावर चैताली म्हणाली, घरासमोरील मैदानात मुष्टियुद्धाचा सराव करणारी मुले रोज पाहत होती. सराव करणारे सर्व मुले आहेत, एकही मुलगी नव्हती. त्यामुळे त्यांचे पाहून लपतछपत सराव सुरू केला. एके दिवशी प्रशिक्षकाच्या ते लक्षात आले. त्या वेळी तिने प्रशिक्षकाला प्रश्न विचारला, तुमच्या टीममध्ये एकही मुलगी का नाही. मला तुमच्या टीममध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे.

प्रशिक्षकाने आईशी चर्चा केली. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे तिने नकार दिला. मात्र, प्रशिक्षक संजीव बॅनर्जी यांनी तिचा सर्व खर्च करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आई तयार झाली. यानंतरचा प्रवासही तेवढा सोपा नव्हता. बसमधून जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. चैताली सहा महिने एका थांब्यापर्यंत पायीच जात होती. चैताली आतापर्यंतच्या सात मोठ्या स्पर्धेत केवळ एकदाच पराभूत झाली. तेव्हा आपण चैतालीसोबत नव्हतो, असे माहिती तिला पाच वर्षांपासून प्रशिक्षण देणारे संजीव बॅनर्जी यांनी दिली.