आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहंमद अलीच्या मुलीचाही बॉक्सिंगमध्ये दबदबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महान आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा मोहंमद अलीने बॉक्सिंगच्या रिंगणात आपले वर्चस्व कायम केल्यानंतर आता त्याची मुलगी लैलाही या क्षेत्रात उतरली आहे. लैलाने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये आतापर्यंत खेळलेल्या सर्व २४ लढती जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्यापैकी २१ लढतीत तिने प्रतिस्पर्धीला नॉकआऊट केले आहे.

३० डिसेंबर १९७७ रोजी जन्मलेली लैला ही मोहंमद अली व व्हेरोनिका दांपत्याच्या १० अपत्यांपैकी आठवी आहे. मोहंमद अलीच्या सर्वच अपत्यांनी अन्य क्षेत्रात चांगले करिअर घडवले आहेत. मात्र, लैलाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुष्टियोद्ध्याचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. वडील मोहंमद अलींप्रमाणेच लैलाही प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडते आणि रिंगण गाजवते. याचा प्रत्यय तिच्या कारकीर्दीतील आतापर्यंतच्या आकडेवारीवरून येतो. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये लैलाने २१ लढतींमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंना अक्षरश: रिंगण सोडण्याची वेळ आणली आहे. मोहम्म्द अली फुफ्पुसाच्या आजारामुळे काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

महिला बॉक्सिंगमधील विक्रमी कामगिरी
लैलाने २००२ ते २००५ दरम्यान मिडलवेट चॅम्पियनशिपवर विजेतेपदाचा दावा ठोकला. सलग इतक्या लढती जिंकण्याचा पराक्रम आजपर्यंत एकही महिला बॉक्सर नोंदवू शकली नाही. यापूर्वी एन वॉल्फ (२४ सामन्यांत १ पराभव), वाँडा वार्ड (२३ सामन्यांत १ पराभव), लॅटिया रॉबिनसन (१५ सामन्यांत २ पराभव) आणि नताशा रागोसिना (२२ विजय) यांनी अशी कामगिरी केली होती.

क्रिस्टी मार्टिनकडून घेतली प्रेरणा
लैला आधी नेल सलून चालवण्याचे काम करत होती. या व्यवसायात तिचा चांगलाच जम बसला होता. क्रिस्टी मार्टिनला रिंगणात खेळताना पाहून मी खूपच प्रेरित झाले आणि बॉक्सिंग खेळण्याचा निर्णय घेतला, असे ती म्हणते. ८ ऑक्टोबर १९९९ मध्ये लैला पहिल्यांदाच अप्रिल फॉलरच्या िवरोधात रिंगणात उतरली.