दक्षिण कोरियात आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणा-या बॉक्सर सरिता देवीवर 'एआयबीए' एका वर्षाची बंदी घातली आहे. याबरोबच भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक बी. आय. फर्नांडीस यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल सरिता देवीने माफी मागितली असून तिच्यावरची बंदी मागे घेण्यात यावी अशा प्रकारची विनंती क्रीडा मंत्रालयाने एआयबीए ला पत्र लिहिल्या पत्रात केली आहे.
आशियाई स्पर्धेदरम्यान उपांत्य फेरीत सरिता देवीने दक्षिण कोरियाच्या पार्क जिनावर वर्चस्व गाजवलेले असतानाही पंचानी सरिता देवीविरोधात निकाल दिला. या निर्णयाच्या निषेधार्थ सरित देवीने कांस्य पदक स्वीकारण्यास नकार दिला होता. तिच्या कृतीची बॉक्सिंग संस्थेने गंभीर दखल घेत तिला अनिश्चित काळासाठी निलंबित केले होते. मात्र क्रीडा मंत्रालयाची विनंती आणि बॉक्सिंग इंडीयाच्या विनंतीमुळे अनिश्चित काळासाठीचे निलंबन कमी करून एक वर्षासाठी सरिता देवीच्या खेळावन बॅन आनला आहे.
पुढील स्लाईडवर पाहा भावूक झालेली सरिता...