आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेंदरसिंग करणार पुनरागमन, लवकरच सरावाला प्रारंभ करण्याची आशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- हेरॉइन प्रकरणानंतर सोनिपत येथे सराव करत असलेला ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदरसिंग पुनरागमन करणार आहे. तो लवकरच एनआयएस पतियाळा येथे सराव करताना दिसेल. तो शनिवार वा रविवारपासून सरावाला प्रारंभ करण्याची आशा आहे.

येत्या ऑक्टोबरमध्ये वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारतीय बॉक्सिंग संघाचे सराव शिबिर पतियाळात होणार आहे. 16 ते 18 ऑगस्टदरम्यान होणार्‍या सराव शिबिरात सहभागी झालेल्या खेळाडूंचा निवड समिती विचार करणार आहे. संघटनेच्या नियमानुसार सराव शिबिरात सहभागी न झालेल्या खेळाडूंची निवड केली जाणार नाही. यासाठी विजेंदरलाही या शिबिरात सहभागी होणे आवश्यक आहे.


दूरध्वनीवरून दिली माहिती
मुख्य प्रशिक्षक जी. एस. संधू म्हणाले की, विजेंदरने पतियाळा येथे येत असल्याची माहिती दूरध्वनीवरून दिली. त्याचे या आठवड्याच्या शेवटी पतियाळात आगमन होईल. ऑगस्टमध्ये वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या सरावाला प्रारंभ होईल. शिबिरातील सहभागानंतरच भारतीय संघातील स्थान निश्चित होणार असल्याचे खेळाडूंना माहीत आहे.


जोशी-चौहान सेंटरमध्ये केला कसून सराव
हेरॉइन प्रकरणानंतर नाडाच्या डोप टेस्टमध्ये क्लीनचिट मिळालेल्या विजेंदर सिंगने भारतीय क्रीडा प्राधिकरण सोनिपत येथील जोशी-चौहान सेंटरमध्ये सरावाला प्रारंभ केला होता. मात्र, पतियाळासारखे वातावरण सोनिपत येथे निर्माण झाले नाही. याची विजेंदरलाही जाणीव होती. सर्वच स्टार बॉक्सर सध्या पतियाळातील राष्ट्रीय शिबिरात सराव करत आहेत. त्यामुळे त्याने पातियाळा येथे सराव करण्याचा निर्णय घेतला.