आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boxer Vijender Singh\'s Samples Test Negative For Drugs

ऑलिम्पिक विजेता विजेंदरला दिलासा; डोपिंग टेस्ट निगेटिव्ह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वादाच्या भोवर्‍यात सापडलेला ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंहला दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय डोपिंग नियंत्रक संस्थेने (नाडा) केलेल्या तपासणीत विजेंदर सिंहने अंमली पदार्थ सेवन केले नसल्याचे म्हटले आहे.
विजेंदरवर अंमली पदार्थ सेवन केल्याचा आरोप होत होता. क्रीडा मंत्रालयाच्या आदेशानुसार विजेंदरचे रक्त आणि लघवीचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

विजेंदरसोबत अन्य चार बॉक्सरचेही नमूने पाठवण्यात आले होते. क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, विजेंदर याने ड्रग्स सेवन केल्याने आढळून आलेले नाही. यापूर्वीही गेल्या वर्षी नाडाने दिलेल्या अहवालात विजेंदर याने अंमली पदार्थ सेवन केले नसल्याचे म्हटले होते.