आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉ‍क्सिंग प्रकरणः आता संघटना तपासणार खेळाडूच्‍या जोडीदाराचाही दर्जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- स्टार बॉक्सरला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची सक्ती करणार्‍या संघटनेने आता खेळाडूंच्या स्पायरिंग पार्टनरबाबतीतही ठोस पावले उचलली आहेत. यासाठी बॉक्सिंग संघटनेने नवा नियमही लागू केला आहे. विजेंदर सिंगच्या वादग्रस्त स्पायरिंग पार्टनर राम सिंग प्रकरणातून संघटनेने चांगलाच धडा घेतला आहे.

सर्व बॉक्सर हे आपल्या वजनी गटानुसार स्पायरिंग पार्टनर ठेवतात. हा निर्णय खेळाडू स्वत: घेतात. विजेंदरच्या प्रकरणातही हेच झाले. त्यांच्या सांगण्यावरून राम सिंगला पार्टनर करण्यात आले. मात्र, राम सिंगला कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव नव्हता. यापुढे खेळाडूने सांगितलेल्या पार्टनरचे सर्व रेकॉर्ड तपासले जाईल. तो योग्य असल्यासच त्याला परवानगी मिळू शकेल.


स्पायरिंग पार्टनर म्हणजे काय?
० प्रत्येक बॉक्सरला सरावादरम्यान एक सहकारी खेळाडू दिला जातो. त्याला स्पायरिंग पार्टनर असे म्हणतात.
० यानुसार या दोन्ही खेळाडूंचे वय आणि वजन समान असले पाहिजे. विजेंदरच्या प्रकरणात असे झाले नव्हते, कारण राम सिंग 91 किलोंपेक्षा अधिक वजन गटात खेळत होता आणि विजेंदर 75 किलो वजनी गटात खेळला.


प्रशिक्षकांवरही आता नजर

०खेळाडूंपाठोपाठ आता संघटनेची प्रशिक्षकांवर बारीक नजर असेल. खेळाडूंच्या कामगिरीबाबत संघटना आता त्यांना विचारणा करणार आहे. अधिकार्‍यांच्या मते लवकरच एक समिती स्थापन केली जाईल.
० ही समिती खेळाडूंच्या कामगिरीबाबत प्रशिक्षकांशी चर्चा करेल. उदाहरणार्थ एका खेळाडूने मागील वर्षी चांगली कामगिरी केली आणि पुढील वर्षी तो अपयशी ठरला, तर त्याच्या सुमार कामगिरीची कारणे प्रशिक्षकांना विचारली जातील.

आधी तपासणी

कोणत्याही खेळाडूला त्याच्या सांगण्यावरून स्पायरिंग पार्टनर दिला जाणार नाही. त्याची पहिल्यांदा पूर्ण तपासणी केली जाईल. दर्जा तपासला जाईल आणि त्यानंतर तो स्पायरिंग करू शकेल. मग तो कोणीही असो. आम्ही तपासणी केल्याशिवाय कोणालाही स्पायरिंगसाठी परवानगी देणार नाही.
रमेश भंडारी, महासचिव, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया