आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडू बनला आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारा धोनी वार्षिक 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावत आहे. नुकत्याच एका जाहिरात करारासाठी धोनीने 13 कोटी रुपये मानधन घेतले आहे. म्हणजेच दिवसाला धोनीच्या तिजोरीत तब्बल 82 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची भर पडत आहे.
गेल्या चार महिन्यांत धोनीची ब्रँड व्हॅल्यू 60 टक्क्यांनी वाढली. या काळात टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील मजल वगळता त्याची कामगिरी यथातथाच राहिली. उलट स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव आल्याने धोनीच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला. तरीही कमाईत धोनी अग्रेसरचा राहिला आहे.
विराटला मागे टाकले : धोनीने कमाईत तेजतर्रार विराट कोहलीलाही पिछाडीवर टाकले. विराटने गेल्या वर्षी अदिदाससोबत वार्षिक 10 कोटींचा करार करत धोनीला मागे टाकले होते.
धोनीला पसंती कशामुळे : सातत्यपूर्ण कामगिरीने संपादन केलेला विश्वास 1 बुचकळ्यात पाडणारी चाल खेळून डाव पालटण्याची खुबी 1 मीडिया व सोशल मीडियातील अलोट लोकप्रियता.
यातूनही मिळकत
- भारतीय संघातून खेळल्याबद्दल मिळणारे मानधन
- आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळल्याबद्दल मिळणारे मानधन
- इंडिया सिमेंट्स कंपनीतील उपाध्यक्षपदापोटी मिळणारे वेतन.
धोनीकडे 21 ब्रँड्स
- 21 ब्रँड्सचा धोनी आजघडीला प्रचार व जाहिराती करत आहे.
- प्रमुख ब्रँड्स : पेप्सी, एअरसेल, रिबॉक, एक्ससाइड, टीव्हीएस आदी 21 ब्रँड्स.
- 2013 मध्ये धोनीची एंडॉर्समेंट फीस प्रतिकरार 8 कोटी रुपये होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.