आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचा-याचा मुलगा बनला 518 कोटींचा मालक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात...अशी म्हण आहे. ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिन्होला ही म्हण तंतोतंत लागू होते. कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या रोनाल्डिन्होने गुरुवारी वयाची 33 वर्षे पूर्ण केली. शिपयार्डमध्ये काम करणा-या एका साधारण कर्मचा-याचा मुलगा कधी जगातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसेल, याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र, मेहनत आणि गुणवत्तेच्या बळावर रोनाल्डिन्होने हे यश मिळवले.

वडिलांचा आधार गेला.. - रोनाल्डिन्होचा जन्म ब्राझीलच्या रियो ग्रांडे डो सुल पोर्टो एलिग्रे शहरात झाला. त्याची आई डोना सान्तोस सुरुवातीला एक सेल्वगर्ल होती. कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी तिने परिचारिकेचे शिक्षण पूर्ण केले. त्याचे वडील जाओ डी असिस मोरीरा एका शिपयार्डमध्ये साधारण कर्मचारी होते. शिपयार्डवर कामाऐवजी ते एका स्थानिक फुटबॉल क्लबमध्ये खेळत असे. वडिलांकडे बघून रोनाल्डिन्हो सुद्धा फुटबॉल खेळू लागला. 8 वर्षांचा असताना त्याच्या वडिलाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

एका सामन्यात 23 गोल- वयाच्या 13 व्या वर्षी एका स्थानिक संघाकडून खेळताना रोनाल्डिन्होने सामन्यात तब्बल 23 गोल केले. येथूनच तो चर्चेत आला.

यू-ट्यूबची ओळख निर्माण केली - आजघडीला 63 मिलियन पौंडचा मालक असलेल्या रोनाल्डिन्होने 2005 मध्ये नाइकीसाठी एक जाहिरात केली होती. या जाहिरातीत एक शानदार गोल करताना तो दिसतो. त्याच वर्षी व्हिडिओ स्पेशल साइट यू-ट्यूब लाँच झाली होती. त्यावेळी या वेबसाइटची ओळख कोणालाच नव्हती. मात्र, रोनाल्डिन्होचा हा व्हिडिओ यू-ट्यूबवर येताच या साइटची लोकप्रियता शिखरावर पोहोचली. यू-ट्यूबच्या या व्हिडिओला पहिल्यांदा 10 लाखांपेक्षा अधिक चाहत्यांनी बघितले.

थोडक्यात रोनाल्डिन्हो - 1997 मध्ये ग्रीसमध्ये झालेल्या 17 वर्षांखालील फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये रोनाल्डिन्होची शानदार कामगिरी ठरली. पेनॉल्टी किकने गोल केल्यामुळे त्याला स्पर्धेत रायझिंग स्टारचा किताब मिळाला.

- 2003 मध्ये बार्सिलोना क्लबसोबत जुळाल्यानंतर रोनाल्डिन्हो मालामाल झाला. बार्सिलोनाचे अध्यक्ष जोआन लापोर्टा यांना डेव्हिड बेकहॅमला आपल्या संघात घ्यायचे होते. मात्र, माद्रिदने त्याच्याशी करार केला. यानंतर त्यांनी रोनाल्डिन्होसोबत करार केला. बार्सिलोनाने 30 मिलियन युरोची महागडी बोली लावून त्याला आपल्या पारड्यात सामील केले. पाच वर्षांच्या कारकीर्दीत त्याने 145 सामने खेळताना क्लबसाठी 70 गोल केले.

- 2008 मध्ये रोनाल्डिन्होला मँचेस्टर युनायटेडकडून 25.5 मिलियन पौंडचा प्रस्ताव आला होता. मात्र, इटालियन क्लब एसी मिलानने 5.1 मिलियन पौंडची ऑफर देऊन त्याला आपल्याकडे खेचले.