आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलच्या बाजारपेठेत फुटबॉल वर्ल्डकपची हवा; चिमुकल्यांमध्येही टी शर्टची क्रेझ.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलमध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या प्रारंभाला आता मोजकेच दिवस उरले आहेत. याच वर्ल्डकपच्या आयोजनाबाबत सध्या ब्राझीलमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेत. तर काही भागात मात्र, विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा आक्रमक पावित्रा अंगीकारला आहे.

पाहुण्या टीमच्या विदेशी खेळाडूंच्या आगमनामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. त्यासाठी ब्राझीलमध्ये स्वागताचे वेगवेगळे फंडे आजमावले जात आहे. तसेच विदेशी खेळाडूंना आकर्षित करण्यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यातूनच पाहुण्या विदेशी खेळाडूंसाठी ब्राझीलची बाजारपेठही चांगलीच बहरली आहे. यासाठी ब्राझीलच्या संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या विविध वस्तूंचीही बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात प्रदर्शने भरवण्यात आली आहेत.
मेट्रोमध्ये खास शर्ट वेडिंग मशीन : फुटबॉल चाहत्यांच्या प्रवासासाठी ब्राझीलच्या शासनाने मेट्रोची व्यवस्था केली आहे. तसेच याच मेट्रोमध्ये चाहत्यांना आपल्या आवडत्या शर्टची खरेदी करू शकतील, यासाठी खास शर्ट वेडिंग मशीनही बसवण्यात आल्या आहेत. ऑनलाइन रिटेलर नेटशूजने दोन मेट्रो स्टेशन आणि खासगी विद्यापीठाच्या परिसरातही या वेडिंग मशीनची व्यवस्था केली आहे.

परंपरागत शर्टला अधिक मागणी
ब्राझीलमध्ये असलेल्या परंपरागत पिवळ्या रंगाच्या शर्टला अधिकच मागणी येत आहे. चाहत्यांच्या वाढत्या मागणीला लक्षात घेऊन या शर्टची किंमत 100 डॉलर ठेवण्यात आली आहे. चाहते आपल्या देशाच्या परंपरागत शर्टची खरेदी करून आपला आनंद प्रदर्शित करत आहेत.

विरोधकांनी तोडली प्रतिमा
ब्राझीलमध्ये वल्र्डकपच्या आयोजनाला काही नागरिकांचा एक गट प्रचंड विरोध करत आहे. याच विरोधातून मंगळवारी रात्री काही नागरिकांनी सहा मीटर उंच असलेली वर्ल्डकपची प्रतिमा तोडली. याप्रकरणी तत्काळ पोलिसांनी तपास सुरूकेला आहे. तसेच याप्रकरणी लवकरच ही प्रतिमा तोडणार्‍यांना ताब्यात घेतले जाईल, अशी प्रतिक्रिया महापौरांनी दिली आहे.