Home | Sports | Other Sports | brazil out for copa america football tournament

कोपा अमेरिका स्पर्धेत पॅराग्वेकडून गतविजेत्या ब्राझीलचा पराभव

वृत्तसंस्था | Update - Jul 18, 2011, 05:59 PM IST

कोपा अमेरिका स्पर्धेत गतविजेत्या ब्राझीलचा पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये २-० असा पराभव केला.

  • brazil out for copa america football tournament

    ला प्लाटा - कोपा अमेरिका स्पर्धेत गतविजेत्या ब्राझीलचा पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये २-० असा पराभव केला. निर्धारित वेळेत आणि जादा वेळेत सामना ०-० असा बरोबरीत राहिला होता.

    पॅराग्वेचा गोलरक्षक ज्युस्टो विलर याने संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. शनिवारीच या स्पर्धेतून अर्जेंटिना या स्पर्धेतून बाहेर गेला होता. अर्जेंटिनाचा उरुग्वेने पेनल्टी शूटआउटमध्येच पराभव केला होता. पॅराग्वेचा संघ १९८९ नंतर प्रथमच या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोचला आहे. उपांत्य फेरीत पॅराग्वेचा सामान व्हेनेझुएलाशी होणार आहे. व्हेनेझुएलाने उपांत्यपूर्व फेरीत चिलीचा २-१ असा पराभव केला.

Trending