आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझील हरल्यावर वाटले, जणू देश मरण पावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझीलचे महान फुटबॉल खेळाडू पेले म्हणतात की, त्यांनी कित्येक अशा जाहिरातींचे प्रस्ताव नाकारले जे त्यांना योग्य नाही वाटले. माझा ज्याच्यावर विश्वास त्या गोष्टींचे मी समर्थन करत नाही. मला आजदेखील सिगार किंवा मद्याच्या जाहिरातींचे अनेक प्रस्ताव मिळतात. मात्र मी त्याला योग्य मानत नाही. ते युवक आणि खेळाडूंसाठी हानिकारक आहे. टाइमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा केली..

प्रश्न : तुम्ही म्हणता की, 1950 च्या फुटबॉल अंतिम लढतीत उरुग्वेकडून ब्राझीलच्या पराभवाचा तोच परिणाम झाला जो अमेरिकेत केनेडींच्या हत्येने झाला होता. ही अतिशयोक्ती नाही का?
उत्तर : मला असे वाटत नाही. भावनांचा उद्रेक एकदम सारखाच होता. जेव्हा ब्राझील हरले तेव्हा असे वाटले की, काही मरण पावले आहे. देशच मरण पावला आहे. असेच केनेडींच्या हत्येच्या वेळी झाले होते.

प्रश्न : येणार्‍या विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलची स्थिती काय आहे?
उत्तर : ब्राझील सशक्त दावेदार आहे, यात शंकाच नाही. हा जगातील सर्वश्रेष्ठ संघांपैकी एक आहे. परंतु हा विश्वचषक वेगळा असेल. ब्राझीलकडे नेहमीच चांगले फॉरवर्ड आणि विंगर राहिले आहेत. यावेळी पहिल्यांदा ब्राझीलची रक्षा रेषा मजबूत आहे. आमच्या कोचला फॉरवर्ड लाइन निवडण्यात काहीशी अडचण येईल.

प्रश्न : विश्वचषक फुटबॉलचे यजमानपद आणि मैदान बनवण्यासाठी ब्राझीलवर टीका होत आहे. टीकाकारांचे म्हणणे आहे की, आयोजन स्थळाच्या आसपास राहण्याचे लोकांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
उत्तर : विरोध आणि टीकेला काहीतरी कारण आहे. लोक भ्रष्टाचाराची तक्रार करत आहेत. त्यात सत्यता आहे. ब्राझीलकडे उत्पन्न आणि पर्यटन वाढवण्यासाठी दोन चांगल्या संधी विश्वचषक आणि ऑलिम्पिक खेळ आहेत. खेळाडूंना भ्रष्टाचाराशी काही घेणे-देणे नाही. परंतु विरोध करणारे लोक विश्वचषकाला हानी का पोहोचवत आहेत. ते पूर्ण होईपर्यंत वाट पाहा. मग राजकीय नेते आणि गुन्हेगारांना कारागृहात डांबा.

प्रश्न : जर तुम्ही आजही फुटबॉल सामने खेळत राहिले असता, तर तुमच्या कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ राहिलेल्या खेळासारखा आता तुमचा खेळ राहिला असता का?
उत्तर : मी आणखी चांगला राहिलो असतो. अलीकडे तयारी चांगली चालते. तंत्रज्ञान मदत करते. नियमांचाही खेळाडूंना फायदा होतो.

पेलेचे खरे नाव एडसन आहे. थॉमस अल्वा एडिसनच्या नावावरून ते ठेवण्यात आले. पेलेंचा जन्म झाला त्या वेळी त्यांच्या गावी वीज आली होती.