आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेथवेट, एडवर्ड्स चमकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हैसूर - सलामीवीर के. ब्रेथवेट (92) आणि कर्णधार किर्क एडवर्ड्स (91) यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर चारदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज अ संघाने पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावा काढल्या. भारत अ संघाविरुद्ध पहिला दिवस कॅरेबियन फलंदाजांनी गाजवला.


भारताला पहिली विकेट लवकर मिळाली. मात्र, यानंतर के. ब्रेथवेट आणि कर्णधार किर्क एडवर्ड्स यांनी दुस-या विकेटसाठी 173 धावांची मजबूत भागीदारी करून सामन्याचे चित्रच बदलले. ब्रेथवेटने 215 चेंडूंचा सामना करताना 12 चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. एडवर्ड्सने 162 चेंडूंत 1 षटकार आणि 11 चौकारांसह आपली खेळी साकारली.


संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज अ : 5 बाद 264 धावा. (ब्रेथवेट 92, किर्क एडवर्ड्स 91, 2/60 परवेज रसूल).