आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brett Lee News In Marathi, Australia, Sachin Tendulkar, Divya Marathi

ब्रेट लीच्या नजरेत लारापेक्षा तेंडुलकर श्रेष्ठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून प्रख्यात असलेल्या ब्रेट ली याने सचिन तेंडुलकरला ब्रायन लाराच्या तुलनेत वरचे स्थान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक्स कॅलिसच्या अगदी विरोधी सूर लावत लीने सचिनच्या श्रेष्ठतेवर शिक्कामोर्तब केले आहे.


दोन सर्वोत्कृष्ट फलंदाजांची तुलना करायची झाल्यास मी सचिनलाच श्रेष्ठ म्हणेन, असे त्याने नमूद केले. सचिन जेव्हा फलंदाजीला मैदानात यायचा, तेव्हा त्याचे जे काही वलय होते, ते केवळ एकमेवाद्वितीय होते. सचिनसमवेत माझी अनेकदा लढत झाली आणि त्यातील अनेक लढतींत बहुधा सर्वाधिक वेळा त्याला बाद करण्यात मी यशस्वी झाल्याचेही त्याने नमूद केले. अर्थात आमच्याविरुद्ध झालेल्या त्याच्या बहुतांश शतकांचाही मी साक्षीदार आहे. सचिन जेव्हा समोर असतो, तेव्हा आपसूकच तुम्हाला अजून चांगली गोलंदाजी करण्याची प्रेरणा आपोआप मिळते, असेही त्याने सांगितले.