आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brian Lara's Girlfriend Jamey Bowers News In Marathi

PICS: ब्रायन लाराचे स्‍वत:पेक्षा 20 वर्षांनी लहान मॉडेलसोबत गुटूर गु!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - वेस्‍ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा सध्‍या त्‍याच्‍यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्‍या मॉडेलशी डेटिंग करत आहे. त्‍याच्‍या या 24 वर्षीय प्रेयसीचे नाव जॅमी बोवर्स आहे. तिने गेल्‍या वर्षी 'मिस स्‍कॉटलॅड' हा किताब पटकाविला होता.

ब्रिटीश माध्‍यमांनी प्रसिध्‍द केलेल्‍या वृत्‍तानुसार, ब्रायन लाराची मॅचेस्‍टर युनायटेडचा फुटबॉलपटू ड्वीन यॉर्क याने एका कार्यक्रमामध्‍ये जॅमीसोबत भेट करुन दिली होती. कॅरिबीयन स्‍टार लारा आणि जॅमी यांच्‍यामधील अफेअरला सुरुवात साध्‍या मैत्रीमधून झाली. यापूर्वी लाराचे त्रिनिदादमधील मॉडल आणि पत्रकार असलेली लीजस रोवेडास सोबत अफेअर होते. लीजल आणि लारा यांना दोन मुलीसुध्‍दा आहेत.

माध्‍यमांनी जॅमीला अफेअर विषयी विचारणा करताच जॅमीने या वृत्‍ताला दुजोरा दिला. ती म्‍हणाली, की ''आमचे संबंध सध्‍या नवीन आहेत, आम्‍हाला त्‍याविषयी कुणाला सांगायचे नव्‍हते परंतु ब्रिटनमध्‍ये अफेअर लपविने कठीण आहे'' एवढेच नव्‍हे तर जॅमीने लारा आणि तिचे फोटो इस्‍टाग्रामवर पोस्‍ट केली आहेत. यावरुन या दोघांमधील अफेअरला दुजोरा मिळाला आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, लाराच्‍या नवीन प्रेयसीचे छायाचित्रे...