ग्लासगो - राष्ट्रकुल स्पर्धेचा जोर चांगलाच वाढला आहे. 71 देशांमध्ये पदकासाठी चुरस सुरु असताना ब्रिटनच्या राजकुमाराने वहिनी केटसोबत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. ब्रिटनच्या राज घराण्याने ग्लासगोला पोहोचून सामन्यांचा आनंद घेतला आहे.
महिलांचा उत्साह
राजकुमाराने खेळ पाहण्यासाठी हजेरी लावली असताना महिलामध्ये खासकरुन उत्साहाचे वातावरण्ा होते. ऑस्ट्रेलिया, इंग्लड, स्कॉटलँडसहित अन्य काही देशांच्या महिलांनी प्रिन्स हॅरीसोबत फोटो घेण्यासाठी घाई केली होती.
विलियम, हॅरी आणि केट यांनी रॉयल बॉक्समध्ये न बसता सामान्य प्रेक्षकांच्या गटात बसून सामन्यांचा आनंद घेतला.
(फोटोओळ - बॉक्सिंगबद्दल वहिनीला काही सांगताना ब्रिटेनचा प्रिंन्स हॅरी)
पुढील स्लाइडवर पाहा, रॉयल फॅमिलीसोबत महिलांनी छायाचित्रे घेण्यासाठी केलेली गर्दी