आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Buckingham Palace Hosts Football Match First Time In 308 Years History

इतिहासात पहिल्‍यांदाच बकिंगहम पॅलेस बनले खेळाचे मैदान, प्रि‍न्‍सने खेळाडूंना दिली चेतावनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणी तुम्‍ही आपल्‍या आजीच्‍या अंगणात फुटबॉल किंवा क्रिकेटसारखे खेळ अनेकवेळा खेळले असाल. घरासमोरील अंगणात खेळण्‍याची मजाच काही और असते. परंतु, त्‍याचबरोबर घराची काच फुटण्‍याची तसेच आजीचे बोलणे ऐकून घेण्‍याची भीतीही असते. ब्रिटनचे प्रिन्‍स विल्यिम्‍सही तुमच्‍याप्रमाणेच आपली आजी क्विन एलिझाबेथला घाबरतात.

असोसिएशन फुटबॉलचा 150वा वर्धापन दिन साजरा करण्‍यासाठी प्रिन्‍स विल्यिम्‍सने बंकिगहम पॅलेसच्‍या मैदानावर एका सामन्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. 308वर्षांच्‍या इतिहासात शाही महालात पहिल्‍यांदाच एक फुटबॉल सामना खेळवण्‍यात आला. ड्यूक ऑफ केंब्रिज प्रिन्‍स विल्यिम्‍स फुटबॉल असोसिएशनचे अध्‍यक्षही आहेत. या खास दिवसाला आणखी स्‍पेशल बनवण्‍यासाठी त्‍यांनी पॉलि‍टेक्निक फुटबॉल क्‍लब आणि सिव्हिल सर्व्हिस टीम यांच्‍यादरम्‍यान सामन्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते.

महालाच्‍या खिडक्‍यांच्‍या काचा न फोडण्‍याची वॉर्निंग सामना सुरू होण्‍यापूर्वी विल्यिम्‍सने सर्व खेळांडुना दिली होती. जर त्‍यांच्‍याकडून असे झाले तर त्‍यांना स्‍वत:ला महाराणींनी उत्तर द्यावे लागेल असे म्‍हटले होते. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा या ऐतिहासिक सामन्‍याचे काही खास फोटो...