नवी दिल्ली - भारताचा
पंकज अडवाणी हा गत दीड दशकापासून स्नूकर खेळातील वैश्विक महान खेळाडू आहे. त्याचे महानपण त्याने गतवर्षातील अनेक स्पर्धांच्या विजयाने कायम राखले आहे. मावळत्या वर्षात त्याने सुमारे १२ स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे.
पंकजचे महानपण जगभरात वाखाणले गेले असले, तरी मावळत्या वर्षात त्याच्या साम्राज्याला एका चिनी युवा खेळाडूने धक्का दिला आहे. चीनच्या यान बिंगताओ या १४ वर्षांच्या खेळाडूने पंकजला आश्चर्यचकित करून टाकले आहे.
पंकजने चीनमध्ये मिळवले होते पहिले यश
पंकज १८ वर्षांचा असताना त्याने चीनमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत करियरमधील पहिले विजेतेपद पटकावले होते. विशेष म्हणजे त्याला मावळत्या वर्षात आव्हान देणारा युवकदेखील चीनचाच आहे.
मी आनंद घेतो...
मी माझ्या खेळाचा पुरेपूर आनंद घेतला. मात्र, माझ्यापेक्षा चीनचा युवा खेळाडू यानने अत्यंत संतुलित खेळ केल्यानेच तो जिंकल्याची प्रतिक्रिया पंकजने दिली होती. त्यामुळे यान जिंकल्याचे आणि त्या स्पर्धेत मी हरल्याचे कोणतेही दु:ख नसल्याचे तो म्हणाला. मावळत्या वर्षातदेखील अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये पदके पटकावली असून पुढे किती काळ असे विजय मिळवू शकेन, ते सांगता येत नसल्याचे पंकज अडवाणीने नमूद केले.