आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलिसचा पंच असनानीसोबत वाद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आयपीएल-6 मध्ये सुमार पंचगिरीमुळे खेळाडू आणि पंचांमध्ये वाद होत राहतात. कोलकाता नाइट रायडर्स - पुणे वॉरियर्स यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात कॅलिस आणि पंच सुधीर असनानी यांच्यात वाद झाला. एका निर्णयावर नाराज झालेल्या कॅलिसने पंचासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. धावबाद केल्यानंतर तिस-या पंचाने पुणे वॉरियर्सकडून निर्णय दिला. यामुळे संतप्त झालेल्या कॅलिसने हा वाद घातला. दरम्यान, सर्व खेळाडूंनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. गौतम गंभीरही पंचासोबत हुज्जत घालण्यासाठी समोर आला. मात्र, असनानी यांनी खांद्यावर हात ठेऊन कॅलिसला गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, अ‍ॅरोन फिंच त्रिफळाचीत झाल्यानंतर कॅलिसचा राग शांत झाला.