आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमर बेली, ब्लेसिंग ठरले सर्वाधिक वेगवान खेळाडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - वेगाचा बादशहा युसैन बोल्टचा ट्रेनिंग पार्टनर केमर बेलीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 100 मीटरचे सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने हे अंतर अवघ्या 10 सेकंदांत पूर्ण केले. हॅम्पडेन पार्क येथे आयोजित शर्यतीत महिला गटात नायजेरियाच्या ब्लेसिंग ओकागवरेने राष्ट्रकुल विक्रमासह विजय मिळवला.

पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत केमरला इंग्लंडच्या अ‍ॅडम जेमिलीकडून आव्हान होते. केमरने संथ सुरुवात केली. मात्र, नंतर लांब पावले टाकत लवकर फिनिशिंग लाइन गाठण्यात तो यशस्वी ठरला. इंग्लंडच्या अ‍ॅडम जेमिलीने 10.10 सेकंदांसह रौप्यपदक, तर जमैकाच्या निकेल एशमेडेने कांस्यपदक मिळवले.
ब्लेसिंगचा विक्रम
महिलांच्या 100 मीटर शर्यतीचे सुवर्णपदक नायजेरियाच्या ब्लेसिंग ओकागवरेने 10.85 सेकंदांसह जिंकले. तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम करताना ही शर्यत जिंकली. डोपिंगच्या कारणामुळे फेब्रुवारीत निलंबन संपवून परतलेली कॅम्पबेल ब्राऊनने 11.3 सेकंदांसह दुसरे स्थान मिळवले. नायजेरियाचीच खेळाडू केरोन स्टिवर्टने 11.7 सेकंदांसह कांस्यपदक मिळवले.

हा मोठा सन्मान
हा विजय एक मोठा सन्मान आहे. आता मायदेशी माझे पुनरागमन अत्यंत शानदार होईल. मी खेळावर लक्ष केंद्रित करताना खूप तयारी केली होती. मी माझा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही. सर्वांचे आभार. ब्लेसिंग ओकागवरे, नायजेरिया.