आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Can England Disrupt Sri Lanka's Mojo News In Marathi

आज श्रीलंकन वाघांचा सामना इंग्लिश सिंहांशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितगाव - सलग दोन सामने जिंकल्यानंतर उत्साहित आशियाई चॅम्पियन श्रीलंका क्रिकेट संघापुढे आयसीसी टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी ग्रुप वनमध्ये इंग्लंडचे मजबूत आव्हान असेल. या सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेची टीम उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील असेल. श्रीलंकेने या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला रोमांचक सामन्यात पराभूत केले होते. दुसर्‍या सामन्यात त्यांनी हॉलंडला सहजपणे पराभूत केले. दुसरीकडे इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमाने पराभवाचा सामना करावा लागला.

श्रीलंकेचा विचार केल्यास आशियाई चॅम्पियन सध्या मैदानावर खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात दमदार प्रदर्शन करत आहे. द. आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेच्या फलंदाजांनी 165 धावा ठोकल्या होत्या. यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी विरोधी संघाला 160 धावांवर ढेर केले. हॉलंडला श्रीलंकेच्या गोलंदाजांनी 39 धावांत गुंडाळून विक्रम केला होता.

मॅच विजेत्या खेळाडूंची गर्दी
श्रीलंकेकडे मॅच विजेत्या खेळाडूंची कमी नाही. उलट खूप गर्दी आहे. कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, अँग्लो मॅथ्यूज आणि दिनेश चांदिमल यांसारखे दिग्गज फलंदाज आहेत. याशिवाय तिसरा परेरा, नुवान कुलशेखरा गोलंदाजीसह फलंदाजीतही हात आजमावू शकतात. संगकारा आणि जयवर्धने यांनी या वर्ल्डकपनंतर आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे ही स्पर्धा जिंकून संस्मरणीय करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

मोठा विजय मिळवण्याचा आफ्रिकेचा प्रयत्न
हॉलंडविरुद्ध ग्रुप वनमध्ये दक्षिण आफ्रिकेची मजबूत टीम मोठा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. हॉलंडवर विजय मिळवून नेट रनरेट मजबूत करण्यासाठीही आफ्रिकेचे प्रयत्न असतील. द. आफ्रिकेची मदार तुफानी गोलंदाज डेल स्टेन, मोर्केल यांच्यावर असेल.