आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Can Rafael Nadal The King Of Clay Keep Hold Of His Crown?

किताब जिंकण्याचे लक्ष्य :राफेल नदाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोंटे कार्ला- येथे सलग नवव्या वेळेस किताब जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवून माजी नंबर वन टेनिसपटू राफेल नदाल मोंटे कार्लो मास्टर्स स्पर्धेत खेळणार आहे.‘माझ्यावर कोणत्याही प्रकारचे अपेक्षांचे दडपण नाही,’ असेही त्याने सांगितले. येत्या महिन्यात विजेतेपदावरचे वर्चस्व राखून ठेवण्यासाठी नदाल फ्रेंच ओपनमध्ये सहभागी होणार आहे.

‘लॅटिन अमेरिका आणि इंडियन वेल्स येथील माझा अनुभव चांगला आहे. सात महिने टेनिस कोर्टपासून दूर राहिल्यानंतर दर्जेदार कामगिरी करणे सोपे नव्हते. यासाठी मी पूर्णपणे विश्रांती घेतली आणि नव्या दमाने स्पर्धेत खेळणार आहे,’ असेही तो म्हणाला. दुखापतीपेक्षा टेनिसवर चर्चा करणे, अधिक आवडत असल्याचेही त्याने सांगितले.

जगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक योकोविकचे घोट्यामुळे या स्पर्धेत खेळणे संदिग्ध आहे. रॉजर फेडररने यापूर्वी, स्पर्धेतून माघार घेतली आहे.