Home »Sports »Latest News» Captain Dhoni Completed Four Thousand Runs In Test

कर्णधार धोनीच्‍या कसोटीत चार हजार धावा पूर्ण

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 24, 2013, 15:11 PM IST

  • कर्णधार धोनीच्‍या कसोटीत चार हजार धावा पूर्ण

चेन्‍नई- टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी करिअरमधील चार हजार धावा पूर्ण केल्‍या. ऑस्‍ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयनच्‍या चेंडूवर षटकार मारून त्‍याने करिअरमधील महत्‍वाचा टप्‍पा गाठला.

धोनीने 74 व्‍या कसोटीत 39.22 च्‍या सरासरीने चार हजार धावा पूर्ण केल्‍या. सामन्‍यापूर्वी त्‍याने 38.06 च्‍या सरासरीने 3883 धावा केल्‍या होत्‍या. या सामन्‍यात त्‍याला 117 धावांची गरज होती. या महत्‍वपूर्ण कामगिरीबरोबरच धोनीने जबाबदारीने खेळत आपले सहावे शतकही पूर्ण केले.

Next Article

Recommended