आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Captain Dhoni Problems In England Test Series News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडमध्ये टीम इंडियाचा आज पहिला अभ्‍यासदौरा: धोनी ब्रिगेड समोर 3 मोठी आव्हाने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंदन - टीम इंडियाच्या खेळाडूंनी बुधवारी लीसेस्टरमध्ये जोरदार अभ्यास केला. गुरुवारी भारतीय संघ लीसेस्टर येथे इंग्‍लंडच्या विरूद्ध पहिला सामना खेळणार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड़ आणि व्‍ही व्‍ही एस लक्ष्मणची मजबूत त्रिकुटा शिवाय खेळत असलेला भारतीय संघ 1959 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामने खेळणार आहे.

इंग्लिश टीम ने भारतात अनेकवेळा 5 किंवा 6 कसोटी सामन्यांची मालिका खेळली आहे, परंतू भारतीय संघमात्र दुसऱ्यांदा असं करत आहे. 2011 मध्ये भारतीय संघ इंग्लंडकडून 0-4 ने पराभूत होऊन परतला होता. आता धोनी ब्रिगेडच्या समोर दोन्ही संघांच्या इतिहासातील सगळ्यात मोठे आव्हान आहे. भारतीय संघासमोर सगळ्यात मोठी समस्या ओपनर्सची आहे.

सगळ्यात मोठे आव्हान - ओपनिंग जोड़ी
2011 च्या इंग्लंड दौऱ्यावर टीम मैनेजमेंट ने चार ओपनर्स आजमावले होते.तिसऱ्या क्रमांकावर आपली जबाबदारी उत्कृष्टरीतीने पार पाडणाऱ्या राहूल द्रविडला ओपनर म्हणून उतरावे लागले होते. परंतू त्याने तो सामनादेखील आपल्या पद्धतीने पार केला होता. द्रविड ने इंग्लंडमध्ये ओपनिंग करत तीन सामन्यांच्या 5 चरणांमध्ये 79.50 च्या सरासरीने 318 धावा केल्या, ज्यात 2 शतकांचा समावेश होता.
द्रविडशिवाय इतर कोणताच भारतीय ओपनर चालू शकला नाही.गौतम गंभीर ने दोन सामन्यांच्या तीन चरणांत एकुण 67 धावा केल्या आहेत, तर वीरेंद्र सहवाग चार चरणांत एकुण 41 धावा करू शकला आहे. युवा ओपनर अभिनव मुकुंदने 49 धावांची पारी खेळली, परंतू तो अर्धशतकदेखील लगावू शकला नाही.त्याने चार चरणांत 16 च्या सरासरीने 64 धावा केल्या.
2014च्या दौऱ्यावर धोनी ब्रिगेडला या डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात जास्त सुधारणा करावी लागणार आहे.यावेळी ओपनर म्हणून खेळण्यासाठी शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि गौतम गंभीर हे खेळाडू पर्यायी आहेत.

जून 2011 ते जून 2014 या काळात झालेल्या कसोटी सामन्यात भारतासाठी 7 ओपनर्स उतरले. शिखर धवन यादरम्यान 7 सामन्यांच्या 11 चरणात 48.54 च्या सरासरीने 534 धावा केल्या, ज्यात 2 शतक आणि 1 अर्धशतक समाविष्ट होते. परदेशी मैदानांवर राहुल द्रविडनंतर शिखर धवन दूसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला आहे. त्याने फेब्रुवारी 2014 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर ऑकलंडच्या कसोटीत 115 धावांची खेळी केली. यानंतर वेलिंगटन कसोटीतील पहिल्या पारीत त्याने 98 धावा केल्या. धवन ने डिसेंबर 2013 मध्ये झालेल्या दक्षिण अफ्रीका दौऱ्याच्यावेळी झालेल्या चूकांना न्यूझीलंडमध्ये सुधारल्या. आता हेच प्रदर्शन इंग्लंडमध्येदेखील कायम राहील अशी अपेक्षा आहे.
पहिला ओपनर म्हणून धवनचे नाव निश्चित आहे. त्याला जोडीदार म्हणून गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे यांच्यात सामना होऊ शकतो.
गंभीरने मागच्या 3 वर्षात खेळल्या गेलेल्या 15 कसोटी सामन्यात 30.08च्या सरासरीने 752 धावा केल्या आहेत. तो कोणत्या डावात शतक झळकावू शकला नाह. परंतू त्याच्या खात्यात 5 अर्धशतक जमा आहेत. त्याचा हाय स्कोर 83 धावांचा आहे, जो त्याने 3 जानेवारी 2012 ला झालेल्या सिडनी कसोटीच्या तिसऱ्या डावात बनवला होता.
(फोटोओळ - बुधवारी प्रॅक्टिस सेशनच्या दरम्यान कोच ट्रेवर पॅनीसोबत धावताना ओपनर शिखर धवन.)
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, द्रविड आणि सचिनची जबाबदारी जाणार कोणाच्या खांद्यावर...