आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Captain Mahendra Singh Dhoni Loses Twenty20 Cricket World Cup News In Marathi

युवराज एकटा दोषी नाही; मलिंगाच्या शानदार गोलंदाजीने आम्हाला बांधून ठेवले - धोनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - आयसीसी टी - 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात युवराजसिंगने केलेली संथ फलंदाजीच भारताच्या पराभवास कारणीभूत ठरली, असे वाटत नाही का? या एकाच विषयावर केंद्रित झालेल्या विविध प्रश्नांनी आणि पराभवाने संत्रस्त झालेला भारतीय संघाचा कर्णधार धोनीने ‘असं आयुष्यात कधीतरी घडतं, युवराज एकटाच दोषी नाही,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. मात्र, धोनीला एकूणच या स्वरूपाच्या प्रश्नांना उत्तर देणे जड जात होते.
युवराजने अंतिम सामन्यात 21 चेंडूंवर अवघ्या 11 धावा केल्यानेच भारताची धावसंख्या 130 च्या पुढे जाऊ शकली नसल्याचेच चित्र असल्याने त्याबाबतच धोनीवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. 130 धावांचे सोपे लक्ष्य श्रीलंकेने 18 व्या षटकातच पार केल्याने भारताला पराभवाची नामुष्की सहन करावी लागल्याचे मत पत्रकारांनी व्यक्त केले.
एखादा दिवस तुमचा नसतोच
तो युवराजचा दिवस नव्हता. त्याने त्याच्या परीने सर्वोत्तम प्रयत्न केले. मात्र, मैदानावर यायचे आणि पहिल्या बॉलपासून चेंडू टोलवायला लागायचे हे काही सहजसोपे नसते. एखादा दिवस तुमचा नसतो, त्यावेळी तुमच्या मनासारखं काहीच घडत नाही. तसेच त्याप्रसंगी झाले. युवराज त्या क्षणी धावा काढू शकत
नव्हता. तो त्याच्या परीने प्रयत्न करीत होता, मात्र अधिक धावा निघू शकल्या नाहीत, असेही त्याने नमूद केले.
वाइड, यॉर्कर्सनी केला घोळ
अखेरच्या चार षटकांमध्ये भारताला फक्त 19 धावा काढता आल्या. याचे कारण मलिंगा शानदार गोलंदाजी करीत होता. मलिंगा आपल्या दमदार गोलंदाजीने आम्हाला अडचणीत आणत होता. त्याने वाइड आणि यॉर्कर टाकून आम्हाला चकवले, असे धोनी म्हणाला.
युवीमध्ये प्रचंड आत्मविश्वास : सचिन
नवी दिल्ली २युवराजसिंगमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. याच्या बळावर भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याची ऊर्जाही त्याच्यात आहे, अशा शब्दांत स्तुती करून ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरने युवीची पाठराखण केली. ‘प्रत्येक दिवशीच चांगली कामगिरी करता येईल, असे कधीही खेळाडूच्या जीवनात होत नाही. एकाच दिवशी चमकणारा खेळाडू भविष्यात एखाद्या दिवशी अपयशी ठरतो, त्यामुळे त्याच्या मागील कामगिरीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल, असेही या वेळी सचिन म्हणाला.