(फाइल फोटो - महेंद्रसिंह धोनी)
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज 7 जुलै रोजी आपला 33वा वाढदिवस साजरा करत आहे. धोनीला आता आतापर्यंत टी-20 चा स्पेशॅलिस्ट फलंदाज म्हटले गेले असले तरी कसोटी सामन्यांमध्ये त्याने सचिन तेंडुकर आणि सर डॉन ब्रॅडमन यांना मागे सोडले आहे. 22 फेब्रुवारी 2013 रोजी चेन्नई येथे झालेल्या कसोटीमध्ये धोनीने 224 धावांची विक्रमी खेळी केली होती.
धोनीने 24 चौकार आणि सहा षटकाराच्या सहाय्याने सचिन आणि सर डॉन ब्रॅडमन चा रेकॉर्ड तोडला होता.
मोडला सर डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड
एकाच दिवसामध्ये दुहेरी शतक झळकवणारा धोनी एकमेव भारतीय फलंदाज आहे. चेन्नईमध्ये कसोटीच्या तिस-या दिवशी खेळाताना धोनीने 109 धावा बनविल्या होत्या. चहापानापर्यंत धोनीने 97 धावा केल्या होत्या तर लास्ट सेशनमध्ये त्याने वेगवान खेळी साकारत करिअरमधील दुहेरी शतक झळकावले होते. स्टंप्सपर्यंत 206 धावा बनवत तो नाबाद होता.
पुढील स्लाइडवर वाचा, धोनीचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड..