Home »Sports »Latest News» Captain Mahendrasingh Dhoni Injured

टीम इंडियाच्‍या तयारीला धक्‍का, धोनीच्‍या अंगठयाला दुखापत

दिव्‍य मराठी वेबटीम | Jan 18, 2013, 20:31 PM IST

  • टीम इंडियाच्‍या तयारीला धक्‍का, धोनीच्‍या अंगठयाला दुखापत

रांची- इंग्‍लंडविरूद्धच्‍या मालिकेतील दुस-या सामन्‍यात विजय मिळवून उत्‍साहाने रांचीमध्‍ये दाखल झालेल्‍या टीम इंडियाला धक्‍का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्‍या उजव्‍या अंगठयाला दुखापत झाली आहे. शुक्रवारी सराव करताना त्‍याला ही दुखापत झाली.

मात्र टीम व्‍यवस्‍थापनाने धोनी ठीक असल्‍याचे सांगितले आहे. धोनी पहिल्‍यांदाच आपल्‍या शहरात आंतरराष्‍ट्रीय सामना खेळत आहे. टीम इंडियाचे व्‍यवस्‍थापक सतीश यांनी धोनी व्‍यवस्थित असून त्‍याच्‍या अंगठयाचा एक्‍सरे काढण्‍याची काही गरज नाही. तसेच टीममधील 15 खेळाडू फिट असल्‍याचे म्‍हटले.

नेटमध्‍ये धोनीने सुमारे 10 मिनिटे गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव केला. भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक जो डावेस यांच्‍या उसळत्‍या चेंडूमुळे त्‍याला ही दुखापत झाली. चेंडू लागल्‍यानंतर त्‍याने फलंदाजी केली नाही. परंतु, तो अंगठयावर बर्फाच्‍या पट्टया लावताना दिसला.

शनिवारी वनडे मालिकेतील तिसरा सामना नव्‍याने बांधण्‍यात आलेल्‍या जेएससीए आंतरराष्‍ट्रीय स्‍टेडिअमवर होणार आहे.

Next Article

Recommended