आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, काय आहे कॅप्‍टन कूल महेंद्रहसिंह धोनीच्‍या मुलीचे नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्याची पत्नी साक्षीने गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात 6 फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी दुपारी 2 च्या सुमारास गुटगुटीत मुलीला जन्म दिला. माही आणि त्याची पत्नी साक्षीने त्यांच्या कन्येचे नाव 'जिबा' असे ठेवले आहे.
काय आहे नावाच अर्थ
जिबा हा फारसी भाषेतील शब्द आहे. जिबाचा अर्थ 'अत्यंत सुंदर' असा होतो. साक्षी आणि माहीने आपल्‍या कन्‍यारत्‍नाचे नावे अगदी शोधून ठेवले आहे. टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीचे हे पहिलेच अपत्य आहे.
हे पण वाचा:कॅप्टनकुल महेंद्रसिंह धोनी झाला 'बाप'; म्हणाला, आधी विश्वचषक नंतर मुलीला भेटणार

महेंद्रसिंह धोनी सध्या भारतीय क्रिकेट संघासोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. त्याला फोनवरुन मुलगी झाल्याची बातमी देण्यात आली. धोनीला मुलीचा फोटो फोनवर पाठवण्यात आला आहे. सध्याच हा फोटो जाहीर करण्यात आलेला नाही. मुलीचा फोटो मीडियात सध्याच देण्यात येऊ नये, असे धोनी कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, माही आणि साक्षीची काही निवडक छायाचित्रे...