कोलकाता - फुटबॉल फक्त खेळण्यासाठी खेळू नका. पॅशन म्हणून खेळा. झोपेत सुद्धा फुटबॉलचेच विचार आले पाहिजे, इतके खेळाशी समरस व्हा. असे केले तरच तुमची स्वप्ने साकारली जातील, असा कानमंत्र ब्राझीलला विश्वचषक जिंकून देणार्या माजी कर्णधार कार्लोस अल्बर्टो टोरेसने भारतीय युवांना दिला.
भारत दौर्यावर आलेल्या टोरेस यांनी युवा फुटबॉलपटूंना विशेष मार्गदर्शन केले.‘यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत करावी लागते. फुटबॉलमध्ये स्वत:ला झोकून द्या. स्वप्न साकारण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. मनोरंजनासाठी नव्हेतर करिअरसाठी खेळा,’ असेही टोरेस म्हणाले.