आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Carlsen Crowned World Champion 2014 Special Story In Matathi

पाच वेळचा जगज्‍जेता विश्‍वनाथ आनंदला पराभूत करुन कार्लसन ठरला 64 घरांचा \'किंग\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - दुस-यांदा विश्‍वविजेता ठरलेला कार्लसन)
नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन सलग दुसर्‍यांदा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने रविवारी पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदला पराभूत केले. गतविजेत्या कार्लसनने अकराव्या फेरीत विजय मिळवून किताबावर नाव कोरले. त्याने 6.5 गुणांच्या आघाडीने जेतेपद आपल्या नावे केले. तर पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या आनंदला 4.5 गुणांची कमाई करता आली.
सलग दुस-यांदा विश्‍व चॅम्पियन ठरलेल्‍या कार्लसनविषयी काही खास आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहेत..
कार्लसनचे संपूर्ण नाव स्‍वेन मॅग्‍नस अर्वेन कार्लसन आहे. त्‍याचा जन्‍म 30 नोव्‍हेंबर 1990 रोजी नॉर्वेमधील टन्‍सबर्ग, येथे झाला. 2013 पासून मॅग्‍नस जगातील पहिल्‍या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्‍याची सर्वोत्‍तम रेटिंग 2872 आहे. तर फिडे रेटिंग 2862 आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सर्वांत तरुण जगज्‍जेता मॅग्‍नस कार्लसनविषयी