आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Caroline Garcia Stuns Jelena Jankovic For First WTA Title News In Divya Marathi

कॅरोलिन गार्शियाला डब्ल्यूटीए बोगोटा किताब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोगोटा - फ्रान्सची युवा खेळाडू कॅरोलिन गार्शियाने डब्ल्यूटीए बोगोटा ओपन टेनिस स्पर्धेचा किताब पटकावला. तिने एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या जेलेना यांकोविकला पराभूत केले. तिने 6-3, 6-4 अशा फरकाने विजय मिळवला. यासह तिने स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. तिचा हा करिअरमधील पहिला डब्ल्यूटीए किताब ठरला.

या पराभवासह गतविजेत्या यांकोविकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिने अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी दिलेली झुंज अपयशी ठरली.

दमदार सुरुवात करताना गार्शियाने पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. तिने 6-3 ने पहिला सेट आपल्या नावे केला. मात्र, दुसर्‍या सेटमध्ये सर्बियाच्या खेळाडूने दमदार पुनरागमन करताना गार्शियाला रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फ्रान्सच्या खेळाडूने शानदार कामगिरी करून दुसरा सेटही आपल्या नावे केला. यासह तिने या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरले.

फर्नांडो वर्दास्को, गुल्लेमो गार्शियाला विजेतेपद
ह्युस्टन येथे चौथ्या मानांकित फर्नांडो वर्दास्कोने यूएस क्ले कोर्ट टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने दुसर्‍यांदा या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरले. यापूर्वी त्याने ही स्पर्धा 2010 मध्ये जिंकली होती. यंदा त्याने अंतिम सामन्यात निकोलस अलमाग्रोला 6-3, 7-6 ने पराभूत केले. दुसरीकडे गुल्लेमो गार्शियाने मार्सेल ग्रानोल्लेर्सचा 5-7, 6-4, 6-3 ने पराभव करून ग्रँडप्रिक्स हस्सन-2 स्पर्धेचा किताब पटकावला.