आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेच्या विजयाने भारताचा अंतिम फेरीतील प्रवास खडतर

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियात सध्या कॉमनवेल्थ बॅंक तिरंगी मालिका खेळविण्यात येत असून या मालिकेत भारताचा अंतिम फेरीत पोहचण्याचा मार्ग कठीण झाला आहे. कारण सध्या गुणतालिकेत भारत तळाच्या स्थानावर आहे. भारत, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया या तीनही संघाचे ६-६ सामने झाले आहेत. त्यानुसार श्रीलंका संघ १५ गुण घेऊन आघाडीवर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे १४ गुण तर भारताचे १० गुण आहे. भारताचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. त्या दोन्हीही सामन्यात भारताला श्रीलंका व ऑस्ट्रेलिया संघाला नमवावे लागेल. याशिवाय २ मार्च रोजी होणारया श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीवरही भारताचे भवितव्य अंवलबून आहे. कारण ऑस्टेलियाने श्रीलंकेला हरविले तर ऑस्ट्रेलियाचेही १८ गुण होतील. त्यानुसार नेट रनरेटवर निर्णय अंवलबून असेल. आतापर्यंतच्या लढतीत भारताने निसटते विजय मिळवले आहेत. तर श्रीलंका व भारत यांच्यातील एक सामना टाय झाला होता. एकंदरीत अजून प्रत्येक संघाचे दोन-दोन सामने शिल्लक आहेत. यात कोण बाजी मारेल यावरच अंतिम फेरीतील दोन संघ ठरतील. पण भारतीय संघाची सध्याची सुमार कामगिरी बघता व संघातील वाद (?) लक्षात घेता भारतापुढे अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग अवघड दिसून येत आहे.
गुणतालिकेतील सध्या स्थिती पाहा...
संघ सामने विजय पराभव टाय गुण
श्रीलंका ६ ३ २ १ १५
ऑस्ट्रेलिया ६ ३ ३ ० १४
भारत ६ २ ३ १ १०