आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंदिगड - पर्ल ग्रुपच्या दोन कंपन्यांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सीबीआय आता कबड्डी विश्वचषक स्पर्धेतील संपूर्ण खर्चाचा लेखाजोगा सील करणार आहे. या स्पर्धेसाठी पर्ल ग्रुपचा काळा पैसा वापरण्यात आला, असा दावा सीबीआयने केला आहे. सीबीआयने सध्या स्पर्धा आयोजक पंजाब सरकारकडून संपूर्ण खर्चाचा हिशेब मागितला असून स्पर्धेसाठीच्या प्रायोजकांची यादीही मागवली आहे.
पर्ल ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांत स्पर्धेसाठी 30-35 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत; परंतु स्पर्धेच्या जमा-खर्चाच्या कागदपत्रांत याचा कोठेही उल्लेख नाही, तर पंजाब सरकारच्या मते, सहा कोटी रुपयांची पुरस्कार रक्कम दरवर्षी त्यांच्याकडून देण्यात आली आणि इतर रक्कम प्रायोजकांकडून मिळवण्यात आली होती. कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या खर्चाविषयीचा तपशील पंजाब सरकारने एका आठवड्यात सादर करावा, असे आदेश देण्यात आले असल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
पर्ल ग्रुपचे संचालक निर्मलसिंह भंगू यांचा शोध घेण्यासाठी सीबीआयने इंटरपोलची मदत मागितली आहे. भंगू यांच्याकडे मल्टिपल व्हिसा असल्यामुळे ते कोणत्याही देशात सहजरीत्या जाणे-येणे करू शकतात.
सेबीच्या तक्रारीवरून खटला दाखल
सेबीने दिलेल्या तक्रारीवरून सीबीआयने पर्ल ग्रुपच्या पीएसीएल लिमिटेड आणि पीजीएफ या दोन कंपन्यांवर खटला दाखल केला आहे. कृषक जमिनीची मालिका बनवून लोकांकडून 25 हजार कोटी रुपयांची बेकायदेशीर गुंतवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासाठी सीबीआयने पर्ल कंपन्यांच्या कार्यालयांवरही धाड टाकली होती.
मोठा भ्रष्टाचार
सीबीआयच्या मते, पर्ल ग्रुपने कबड्डी विश्वचषक स्पर्धेसाठी 30-35 कोटी रुपयांचे प्रायोजकत्व दिल्याचे सांगितले; परंतु प्रत्यक्षात आयोजकांना ही रक्कम मिळालीच नाही. ही रक्कम कुठे गेली याची नोंदच नाही. ग्रुपच्या बॅलन्सशीटनुसार ही रक्कम एका इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.